शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

देवपुरात चौघांनी टाकला दरोडा हातपाय बांधून ऐवज लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:14 IST

भूजल कॉलनीतील थरार : पती-पत्नी भेदरले, श्वान पथकासह ठसे तज्ञ दाखल

धुळे : पती-पत्नींचे हातपाय बांधून घरात शिरुन चार दरोडेखोरांनी रोकड आणि दागिने लुटून नेल्याची धक्कादायक घटना देवपुरातील भूजल कॉलनीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली़देवपुरातील पंचवटी गॅस गोडावूनच्या बाजुला असलेल्या भुजल कॉलनीत मु्स्ताक पिंजारी यांचे निवासस्थान आहे़ ते कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतात़ मंगळवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा बाथरुमसाठी बाहेर गेल्यानंतर तो घरात आला़ त्याच्याकडून बहुधा दाराची कडी अर्धवट लावली गेल्याची संधी साधून चार दरोडेखोरांनी पिंजारी यांच्या घरात प्रवेश केला़ मुस्ताक पिंजारी व त्यांच्या पत्नीला दोराच्या सहायाने बांधून ठेवत आवाज केल्यास मारहाण करण्याची धमकी देत कपाटात असलेली १२ हजाराची रोकड, महिलेच्या अंगावरील दागिने असा एकूण सुमारे एक ते दीड लाखांचा ऐवज लुटून घेतल्यानंतर पोबारा केला़घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या जोडप्याने कसे बसे स्वत:ला सावरत मुलाला झोपेतून जागे केले आणि स्वत:ची सुटका केली़ मुलाने नंतर आजुबाजूच्या लोकांना उठविले आणि त्या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ पण, त्याचा काही उपयोग झाला नाही़घटनेची माहिती देवपूर पोलिसांना कळविण्यात आली़ तातडीने पोलिसांचे पथक, श्वान पथक आणि ठसे तज्ञ दाखल झाले़ त्यांनी सविस्तर चौकशी करुन विचारपूस केली़ घटनेची प्राथमिक नोंद देवपूर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे