शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

शिधा मिळविण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 23:59 IST

मालपूर : ई-पॉस मशिनमध्ये अंगठ्याचे ठसे जुळत नसल्याने लाभार्थी लाभापासून वंचित

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. कधी कनेक्टीव्हिटी नसल्याने तर कधी बोटाचे ठसे जुळत नसल्यामुळे लाभार्थ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत असल्यामुळे लाभार्थी अक्षरश: त्रस्त झाले आहेत.शासन, प्रशासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरणाची प्रणाली ई-पॉस मशिनने सुरु केली आहे. मालपूर येथे एकूण तीन स्वस्त धान्य दुकाने असून येथे ई-पॉस मशिनने लाभार्थ्यांना गोंधळात टाकले आहे. या महिन्यात ठसा जुळला, मात्र, पुढील महिन्यात ठसा जुळेलच याची शाश्वती नसल्याने शिधापत्रिकाधारक हैराण झाले आहेत. ई-पॉस मशिनला कधी कनेक्टिव्हिटी मिळत नाही तर कधी लवकर चार्जींग संपते. यासोबतच शिधापत्रिकाधारकांचे ठसे येत नसल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक महिन्याला आधारकार्ड नंबर अपडेट करण्यासाठी व हाताच्या ठशाचे नमुने जुळवून घेण्यासाठी लाभार्थ्यांना पुन्हा पुन्हा आधार सेवा केंद्रावर जावे लागत आहे.एपीएल, बीपीएल आणि अंत्योदय प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत प्रणालीनुसार धान्य पुरवठा करण्यात येत असतो. या धान्य पुरवठा प्रणालीत पारदर्शकता यावी, यासाठी पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनवर कुटुंब प्रमुखासह घरातील सदस्यांचे आधारकार्ड व अंगठ्याचे ठसे घेऊन फेरतपासणी प्रक्रिया सध्या दुकानांवर राबविण्यात येत आहे.तसेच धान्य घेण्यासाठी येणारे कुटुंब प्रमुख व अन्य सदस्यांच्या अंगठ्याचे ठसे घ्यावेत व जुळत नसतील तर मालाचे वितरण करु नये, असे पुरवठा विभागाचे आदेश असल्यामुळे येथील अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मध्यंतरी लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देत समस्या सोडविण्याची प्रशासनाला विनंती केली. मात्र, यानंतरही समस्या न सुटल्याने शिधापत्रिकाधारक हैराण झाले आहेत.तालुका, जिल्हा दक्षता समितीने लाभार्थ्यांच्या समस्येची दखल घ्यावी. अन्यथा स्वस्त धान्य दुकानासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा येथील शिधापत्रिका धारकांनी दिला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे