शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉकर्स झोन’बाबत प्रशासनात उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:49 IST

महापालिका : जागाच मिळेना; शहरात विविध १२ मार्गांवर ७३९ हॉकर्सधारकांचा व्यवसाय 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे :  शहरातील हॉकर्समुळे होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विशिष्ठ ठिकाणी झोन तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आला़ यासंदर्भात बैठका देखील घेण्यात आल्या़ मात्र, प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा प्रश्न आजही प्रलंबित आहे़ हा प्रश्न सुटल्यास आग्रा रोड मोकळा श्वास निश्चित घेऊ शकेल़ हे माहित असून देखील याकडे गांभिर्याने प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही़  महानगर पालिका क्षेत्राकडील नगरपथ विक्रेता समिती गठीत करण्यात आली़ शहरातील फेरीवाला क्षेत्र आणि ना फेरीवाला क्षेत्र ठरविण्याबाबत उपसमिती नेमण्यात आली़ उपसमितीने सादर केलेल्या अहवालावर ७ मार्च २०१८ रोजी बैठक घेण्यात आली होती़ बैठकीत झालेली चर्चा आणि अहवाल हा महासभेपुढे सादर करण्यात आला होता़ महासभेत यावर चर्चा झाली आणि त्यात काही बदल सुचवून महासभेने मान्यता देखील दिली़ त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्याबाबत नगरपथ विक्रेता समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दालनात ४ सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आली होती़ सुमारे ७३९ हॉकर्सधारकप्राथमिक स्तरावर भंगार विक्रेते ११, भाजीपाला विक्रेते १९२, कटलरी व खेळणी विक्रेते ४८, चहा-नास्ता, ड्रायफूट विक्रेते १३०, कपडे, बॅग ४८, पादत्राणे २२, चष्मे, बांगडी ७३, पूजा ३, मसाले ५, गॅरेज व इतर असे ७३९ जवळपास हॉकर्सधारकांचा नियमित व्यवसाय सुरु असल्याचे महापालिकेच्या प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे़ व्यवसायासाठी या जागापाट बाजार ते आपला महाराष्ट्र कार्यालयपर्यंत या ठिकाणी त्याच परिसरातील व नगरपट्टी परिसरातील फेरीवाला करीता जागा असेल़ गणपती मंदिर पुलाजवळील मोराणकर यांच्या घराजवळील फेरीवाल्यांकरीता देवपूर भागातील यशोदा कांडप केंद्रासमोरील जागा असेल़ जेल समोरील रस्ता क्युमाईन क्लब ते जेलपर्यंत या ठिकाणी सर्व प्रकारची कटलरी, खेळणी, कपडे, बॅग, पादत्राणे, काचेच्या वस्तू, फरसाण विक्रेत्यांकरीता जागा असणार आहे़ तसेच जे़ बी़ रोड कोपरा ते टॉवर गार्डन पर्यंतचा रस्ता भाजीपाला विक्रेत्यांकरीता असेल़ भंगार विक्रेत्यांकरीता महापालिका शाळा क्रमांक २५ समोरील जागा असणार आहे़ पाच कंदिल जवळील आग्रा रोड ते ऊस गल्ली पावेतो डाळ्या, मुरमुरे, फुटाणे विकण्याकरीता जागा असणार आहे़ श्रीराम पेट्रोल पंप ते पाण्याच्या टाकीजवळील जागा ही गॅरेज करीता राहील़ सावता माळी मार्केट या ठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांसाठी असणार आहे़ दरम्यान, हा प्रश्न रखडलेला असून उपाययोजना करण्याची गरज आहे़ या ठिकाणी हॉकर्सला मज्जावछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते महात्मा गांधींचा पुतळा (संपुर्ण आग्रा रोड), गल्ली नंबर २ गोल बिल्डींग ते नवग्रही पर्यंतचा रस्ता, झाशी राणी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (पारोळा रोड रस्ता), गल्ली नंबर १ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते राजवाडे बँक चौक पर्यंतचा रस्ता, जयहिंद विद्यालय ते जयहिंद महाविद्यालय पर्यंतचा रस्ता, देवपुरातील गणपती मंदिर पुल जवळील मोराणकर यांच्या घराजवळील परिसर असे एकूण ७ ठिकाणी ‘नो-हॉकर्स’ झोनची निश्चिती करण्यात आलेली आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे