शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

डाक सेवकांची टपाल कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 13:34 IST

बेमुदत संपात ८०० जणांचा सहभाग : ग्रामीण भागातील सेवा ठप्प; प्रलंबित मागण्या निकाली काढण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क

ठळक मुद्देकमलेश चंद्र कमेटी रिपोर्ट लागू करावा,ग्रामीण डाक सेवकांच्या कामाची वेळ आठ तास करावी. ग्रामीण डाक सेवकांना पेन्शन लागू करावी. ग्रामीण डाक सेवकांना दिलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांनी जबरदस्ती करू नये,सातवा वेतन आयोग लागू करावा.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : ग्रामीण डाक सेवकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील ८०० डाकसेवक बेमुदत संपावर उतरले आहेत. शुक्रवारी सकाळी डाकसेवकांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी शहरातील मुख्य पोस्ट आॅफिससमोर आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली. दरम्यान, या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प झाली असून त्याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटना १६ पासून बेमुदत संपावर उतरली आहे. अशा परिस्थितीत सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्या सोडविण्यासाठी वेळकाढूपणा करीत आहे. यासंदर्भात सरकार दरबारी दोनदा बैठका झाल्या. परंतु, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.नोटीस देऊनही उपयोग नाही बेमुदत संपावर उतरण्यासाठी एक महिन्यांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. तरीही सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आल्याचे ग्रामीण डाकसेवकांनी म्हटले आहे. घोषणाबाजीने दणाणला परिसर शहरातील मुख्य पोस्ट आॅफिस कार्यालयासमोर शुक्रवारी सकाळी ग्रामीण डाकसेवकांनी निदर्शने करीत प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटनेचे अध्यक्ष कॉ. एस. एल. बदामे, सचिव कॉ. एम. डी. अहिरे, आर. ई. देवरे, एन. एस. शेख, एल. यू. शिंदे, बी. बी. पालवे, आर. व्ही. खैरनार, जी. आय. खान, यू. डी. बोराडे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील सेवा ठप्प ग्रामीण डाक सेवकांच्या संपामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प पडली आहे. स्पीड पोस्ट, मनी आॅर्डर, लाईट बिल, पत्र व महत्त्वपूर्ण कागदपत्रे पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

प्रलंबित मागण्या निकाली काढण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही संघर्ष करीत आहोत. परंतु, प्रश्न सुटलेला नाही. त्यात आमचा सातव्या वेतन आयोगाचा विषयही लांबणीवर पडला आहे. यासह इतर मागण्याही प्रलंबित आहे. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत हा संप सुरूच ठेवणार आहे.     - एम. डी. अहिरे, सचिव,     आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना