शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

चलन तपासणीमुळे अंदाजपत्रक लांबणीवर!

By admin | Updated: January 18, 2017 00:11 IST

चलने तपासण्यास होत असलेल्या विलंबामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडत आह़े

धुळे : सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनपात नागरिकांनी कर भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या़ परिणामी मनपात 15 दिवसातच 15 कोटी रुपयांचा विक्रमी कर भरणा झाला़ मात्र सदर भरण्याच्या रकमेची चलने तपासण्यास होत असलेल्या विलंबामुळे अंदाजपत्रक लांबणीवर पडत आह़े त्यामुळे लेखा विभागाकडून सर्व विभागांना वारंवार स्मरणपत्रे दिली जात आहेत़सरकारने 8 नोव्हेंबरला हजार व पाचशेच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली़ त्यानंतर लागलीच स्थानिक स्वराज्य संस्थांना जुन्या हजार व पाचशेच्या नोटांच्या माध्यमातून कर भरणा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती़ त्यानंतर या संधीचा लाभ घेण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करीत अवघी यंत्रणा करवसुलीच्या कामास लावण्यात आली होती़ त्यामुळे धुळे मनपाने राज्यातील ड वर्ग महापालिकांमध्ये अव्वल क्रमांक मिळविला होता़ मात्र 15 कोटींच्या करवसुलीनंतर वसुली विभागाकडून नागरिकांनी भरलेल्या चलनांची तपासणी सुरू करण्यात आली आह़े जवळपास 30 हजार चलनांच्या माध्यमातून 15 कोटींचा कर भरणा झाला आह़े वसुली विभागाकडून चलन तपासणीचे काम सुरू असून प्रत्येक मालमत्ताधारकाला आकारलेला कर, त्याच्याकडे असलेली थकबाकी, भरण्यात आलेली रक्कम, धनादेश व चलनांद्वारे संकलित झालेली रक्कम यासारख्या बाबी तपासून त्यांच्या संगणकीकृत नोंदी केल्या जात आहेत़ त्यामुळे या कामास आणखी कालावधी लागू शकतो़ तर दुसरीकडे लेखा विभागाला सुधारित व पुढील वर्षाचे नियमित अंदाजपत्रक तयार करावयाचे असल्याने संबंधित विभागाने सर्व विभागांना पत्रे देऊन जमा व खर्चाचा ताळमेळ मागविला आह़े लेखा विभागाने सर्व विभागांना स्मरणपत्रेदेखील दिली असून काही विभागांनी जमा-खर्चाची आकडेवारी लेखा विभागाला सादर केली आह़े मात्र वसुली विभागात चलन तपासणी सुरू असल्यामुळे जमा रक्कम व खर्चाचा ताळमेळ बसू शकलेला नाही़ काही चलनांचा ताळमेळ बसत नसल्याने प्रक्रिया लांबत असून त्यामुळे अंदाजपत्रकदेखील लांबणीवर पडत  आह़े गेल्या वर्षीही अंदाजपत्रकाला विलंब झाला होता़ त्यामुळे मार्च महिन्यात सुधारित व मे महिन्यात नवीन अंदाजपत्रक मंजूर झाले होत़े यंदाही चलन तपासणीचे काम लवकर मार्गी न लागल्यास अंदाजपत्रक लांबणीवर पडू शकत़े लेखा विभागाचे उपमुख्य लेखापरीक्षक माधव सराई यांची बदली झाल्याने त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आह़े