शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

पंचनामे करण्याची आज शेवटची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 11:43 IST

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान : जिल्ह्यात ३ लाख ६८ हेक्टर क्षेत्राचे झाले नुकसान, आतापर्यंत ८० टक्के पंचनामे पूर्ण

धुळे :आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनामे करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू असून, पंचनामे पूर्ण करण्याची ८ नोव्हेबर शेवटची ‘डेडलाईन’ आहे. आतापर्यंत ८० टक्के क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली आहे. जिल्ह्यात यावर्षी जून ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत दमदार पाऊस झाला. त्यामुळे खरिपाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. सुरवातीच्या कालावधीत पिकांची स्थिती चांगली होती. ज्वारी, मका, बाजरी ही पिके कापणीवर आली होती. मात्र आॅक्टोबर महिन्याच्या सुरवातीपासूनच सर्वत्र अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. एकही दिवस पावसाविना गेला नाही. त्यामुळे यावर्षी ‘आॅक्टोबर हीट’ची जाणीव झालीच नाही. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा खरीपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अतिवृष्टीमुळे ज्वारी, बाजरी, मका ही पिके कापून फेकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कपाशीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान जिल्हयात आॅक्टोबर २०१९ मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकाच्या नुकसानीचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. जिलह्यातील ३० महसूल मंडळात ३ लाख ६८ हजार २७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकºयांची संख्या २ लाख ७० हजार ७७१ एवढी आहे. सर्वाधिक नुकसान धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान धुळे तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात १ लाख २ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या खालोखाल साक्री तालुक्यात नुकसान झालेले आहे. या तालुक्यात ९५ हजार ५८३ हेक्टर, शिंदखेडा तालुक्यात ९२ हजार १८४ हेक्टर तर सर्वात कमी नुकसान शिरपूर तालुक्यात झालेले आहे. या तालुक्यात ७७  हजार ६२५ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्याने, कृषी व महसूल विभागातर्फे संयुक्तपणे १ नोव्हेंबरपासून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करीत आहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या व्हीसी मध्ये नाशिक विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागांची पहाणीदरम्यान निवडणुक आटोपतचा लोकप्रतिनिधींनीही शेतकºयांच्या शेतात जाऊन नुकसाग्रस्त भागाची पहाणी केलीआहे. जिल्ह्यात पालकमंत्री दादा भुसे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, यांच्यासह नाशिक विभागाचे विभागीय सचिव एकनाथ डवले यांनीही नुकसानीचा आढावा घेतलेला आहे. तर कॉँग्रेसपक्षातर्फे शेतकºयांना भरपाई मिळावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. नुकसानग्रस्त शेतकºयांना शासनाने जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. मंडळनिहाय नुकसान झालेली गावे अशी-धुळे तालुका-धुळे शहर, धुळे ग्रामीण, कुसुंबा, नेर, शिरूड, बोरकुंड, आर्वी, मुकयी, फागणे, नगाव, सोनगीर, लामकानी. साक्री तालुका- साक्री, कासारे, म्हसदी प्र.नेर, निजामपूर, दुसाणे, ब्राह्मणवेल, दहिवेल, कुडाशी, पिंपळनेर, उमरपाडा. शिंदखेडा तालुका- शिंदखेडा, चिमठाणे, वर्षी, खलाणे, बेटावद, नरडाणा, विरदेल, शेवाडे, विखरण, दोंडाईचा. शिरपूर तालुका- शिरपूर, थाळनेर, बोराडी, सांगवी, होळनांथे, जवखेडा, अर्थे.

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पंचनामे पूर्ण करण्याची ८ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. आतापर्यंत ८० टक्के बाधित क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.                  विवेक सोनवणे,जिल्हा कृषी अधीक्षक, धुळे

टॅग्स :Dhuleधुळे