शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रूढींना फाटा देत वधूच्या बहिणीला ‘सुक्या’चा मान!

By admin | Updated: February 5, 2017 23:59 IST

बच्छाव-कुंवर कुटुंबाचा आदर्श : प्रियंकाची घोडय़ावरून मिरवणूक

 धमाणे/तिसगाव : समाजात आज मुलगा हा वंशाचा दिवा असतो असा समज आह़े मात्र दिवसेंदिवस होत असलेल्या जनजागृतीमुळे मुले व मुलींमधील भेदभाव कमी होत आह़े याचे उत्तम उदाहरण रविवारी नगाव येथे लग्नसमारंभात बघावयास मिळाल़े यात नेहमी नवरीच्या भावाला दिला जाणारा ‘सुक्या’ होण्याचा मान चक्क नवरीच्या लहान बहिणीला देण्यात आला. याद्वारे बच्छाव आणि कुंवर कुटुंबाने समाजात एक नवा आदर्श निर्माण केला़  होळ (ता. शिंदखेडा) येथील  प्रगतशील शेतकरी शशिकांत शिवराम पाटील (बच्छाव) यांची कन्या  मानसीचा विवाह शिंगावे येथील छोटू वामन कुंवर यांचे सुपुत्र भूपेंद्र यांच्याशी नगाव येथे रविवारी झाला़ रितीरिवाजाप्रमाणे लग्नासाठी आलेली वरात पारावर गेली की नवरदेवाला  घेण्यासाठी नव:या मुलीचा भाऊ ‘सुक्या’ म्हणून घोडय़ावर बसून जातो़ जर नवरीला भाऊ नसेल तर चुलत किंवा मावस भावाला हा मान मिळतो़ मात्र या सर्व रितीरिवाजांना फाटा देत नगाव येथील विवाह सोहळ्यात नवरीची लहान बहीण प्रियंका ही सुक्या म्हणून गेली़ विशेष म्हणजे नवरीने स्वत: आपल्या लहान बहिणीचे औक्षण केल़े प्रियंका ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आह़े  सुक्याची भूमिका प्रियंका बजावेल असे आधीच ठरले होते, असे वधूपिता शशिकांत बच्छाव म्हणाल़े विशेष म्हणजे सासरच्या मंडळींनीही यावर आक्षेप न घेता सहमती दर्शवली सुक्या बनून लग्नात घोडय़ावर बसलेल्या प्रियंकाची गावातून मिरवणूक काढण्यात आली़ थेट मारुतीच्या मंदिराच्या पारार्पयत जाऊन मुलीला अशुभ मानणा:यांसमोर नवा आदर्श निर्माण केला़ विवाह सोहळ्यातील हे वेगळेपण अनेकांनी मोबाइलमध्ये साठविल़े लग्न मुहूर्त बाजूला सारून वधूपित्याने ‘लेक वाचवा’ अभियानावर बोलत जावई व मुलीला अपत्य झाल्यास त्यांना पोलिओ डोस पाजा असा शुभाशीर्वाद दिला़