शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरच्या पोलिसांना दिनू डॉनचा हिसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:24 IST

शिरुडची घटना : पोलिसांचा शोध जारी

ठळक मुद्देधुळे तालुक्यातील शिरुड येथील घटनापळून गेलेला संशयित हा मद्यसम्राट दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाड आहेदिनू डॉनने काही महिन्यापुर्वी धुळे तालुका पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच प्रकरणी रंगेहात पकडून दिले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चंद्रपूर येथे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी दिनू डॉन उर्फ दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना हिसका दाखवत तो पळून जाण्यात यशस्वी ठरला़ ही घटना रविवारी सकाळी धुळे तालुक्यातील शिरुड गावात घडली़ दरम्यान, रात्री यासंदर्भात तालुका पोलीस स्टेशनला दिनू डॉनसह चार जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करुन पळून गेल्याची फिर्याद चंद्रपूर पोलिसांनी  दाखल केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़ त्या गुन्ह्यात दारु पुरविण्याबाबत धुळे जिल्ह्यातील मद्यसम्राट दिनेश गायकवाड उर्फ दिनू डॉन याचे नाव समोर येत आहे़ त्यामुळे  संशयित दिनेश गायकवाड याला ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड पिंप्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांच्यासह पोलिसांचे पथक रविवारी धुळ्यात दाखल झाले़ पथक रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धुळे तालुक्यातील शिरुड गावात पोहचले़ त्याठिकाणी दिनेश गायकवाडची चौकशी करत असताना त्याच्यासह प्रवीण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांनी पोलिसांशी हुज्जत घातली़ त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न केला़ शासकीय कामात अडथळा आणून तेथून पळ काढला.या घटनेनंतर धुळे तालुका पोलीस ठाण्यात पथक दाखल झाले़ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांनी चौघांविरुध्द फिर्याद दिली़ त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघाविरुध्द गुन्हा दाखल झाला़ पथकाने धुळे तालुका पोलिसांची मदत घेवून पुन्हा शिरुड गाव गाठले होते़ परंतु तो पर्यंत हे चौघेही गावातून पसार झाल्याने त्यांच्या हाती आले नाही.