शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

वीजतारांचा धोका, चालढकल रोखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:43 IST

दुर्लक्ष : भूमिगत वीज तारांसह एलईडींवरही भर देण्याची गरज

धुळे : शहरात प्रत्येक प्रमुख चौक व परिसरात वीज तारांचे धोकादायक जाळे पसरत चालले आहे़ त्यामुळे वीज तारांचा धोका रोखण्यासाठी त्या भूमिगत करणे आवश्यक असून त्यासाठी सुरू असलेली चालढकल रोखणे आवश्यक आहे़ दोन वर्षांपूर्वी भूमिगत तारांसाठी शहरातील जीर्ण वीज तारांच्या सर्वेक्षण करण्यात आले होते़ मात्र उद्याप प्रश्न मार्गी लागू शकलेला नाही़अपघातांची मालिकावीज तारा, खांब यामुळे अनेक अपघात झाले आहेत़ अपघाताच्या घटना रोखण्यासाठी जीर्ण वीज तारा बदलणे, रस्त्यातील धोकादायक विद्युत खांब हटविणे, प्रमुख चौकातील वीज तारांचे जाळे भूमिगत करणे ही कामे तातडीने करणे गरज असतांना सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़एलईडी पथदिवे आवश्यकशहरासह जिल्ह्यात एलईडी पथदिव्यांचा वापर वाढविण्यासाठी महावितरणने योजना राबविली होती़ या योजनेंतर्गत एलईडी बल्बची स्वस्तात विक्रीही करण्यात आली़ पण काही दिवसांतच ही योजनाही कोलमडल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे शहरातील एलईडींचा वापर वाढावा, वीज गळती व वीज चोरीचे प्रमाण कमी व्हावे, वीज बिलांची वसुली सुरळीत व्हावी यासाठी एलईडी पथदिव्यांचा वापर वाढविणे गरजेचे आहे़ तसेच शहरातील, महामार्गांवरील पथदिवे एलईडी करण्यासाठीही योग्य कार्यवाही होणे आवश्यक आहे़ तसेच सौर ऊर्जेवरही भर देण्यास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने योजना राबविणे गरजेचे आहे़ शहरातील धोकादायक वीजतारा, उघड्या डीपी, बंद पथदिवे यांचे सर्वेक्षण करून नवीन साहित्य व सुरक्षित ठिकाणी निर्माण करणे आवश्यक आहे़ आधीच अरूंद गल्ल्यांमध्ये असलेल्या वीजतारा व खांबांमुळे वाहतुकीला अडथळा येतो़अधिकारी, कर्मचारी असहकार्यशहरातील जीर्ण विद्यृत तारांमुळे पावसाळ्यात विजपुरवठा अचानक खंडीत होता़े त्यामुळे तांत्रिक बिघाड काढण्यासाठी विजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते़ त्यामुळे रात्रभर विजपुरवठा खंडित होतो़ मात्र अधिकारी व कर्मचारी फोन बंद करून ठेवत असल्याने नागरिकांना नेमकी माहिती मिळू शकत नाही़सहा लाख नागरिक वेठीसजीर्ण तारां, उघड्यावरील विद्यृत डिप्या,वाकलेले खांब, लोमकळणाºया तारांमुळे विजेचा धक्का लागुन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विद्यृत तारा बदलण्याबाबत मागणी करून देखील उद्याप प्रश्न सुटू शकला नाही़ त्यामुळे शहरातील सहा लाख नागरिकांना वेठीस धरले जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे