शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लुबाडणूक टाळण्यासाठी ग्राहकांनो सजग रहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 22:04 IST

अरुण देशपांडे यांची पत्रपरिषदेत माहिती : कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे विक्रेत्यांना निर्देश

ठळक मुद्दे२४ तास तक्रारी करण्यासाठी टोल फ्री क्रमांक अनेकदा चित्रपटगृहांमध्ये बाहेरून पाण्याची बाटली किंवा इतर खाण्याचे पदार्थ घेऊन दिले जात नाही. काही शाळांमध्येही मुलांच्या पालकांना वह्या, गणवेश हे शाळेतूनच घ्यावे, अशी सक्ती केली जाते. तसेच शासनाने ठरवून दिलेल्यप्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्या प्रकरणी चौकशी सुरू... गेल्या काही दिवसात प्लॅस्टीकचे तांदूळ सापडल्याच्या घटना मुंबईमध्ये घडल्या आहेत. धुळ्यातही काही दिवसांपूर्वीच अशी घटना घडली होती. यासंदर्भात अरुण देशपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात चौकशी वैद्यकीय क्षेत्रातील लूट थांबविण्यासाठी लवकरच येणार कायदा... सद्य:स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात रुग्णांची लूट केल्याचे प्रकार घडत आहेत. ती थांबविण्यासाठी लवकरच ‘क्लिनीकल एस्टॅबिलीशमेंट अ‍ॅक्ट’ येणार आहे. हा कायदा आल्यानंतर रुग्णांची फसवणूक होण्याचे प्रकार था

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : ग्राहकांची अडवणूक करून त्यांची लूटमार करण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारचे पारदर्शक धोरण आहे. मात्र, तरीही आभाळ इतके फाटले आहे की त्याला ठिगळ लावणार तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होतो. तरीही ग्राहकांनी सजग राहून लुबाडणूक करणाºयांच्या विरोधात तक्रार द्यावी, असे आवाहन राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष  अरुण वसंतराव देशपांडे (मंत्रीस्तरीय) यांनी येथे आयोजित पत्रपरिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शुक्रवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. देशपांडे पुढे म्हणाले, की पूर्वीच्या सरकारच्या काळात ग्राहकांच्या अनेक अडचणींकडे उदासिनतेने पाहिले जात होते. परंतु मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वात प्रथम ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून ‘राईट टू सर्व्हिस’ अ‍ॅक्ट लागू केला. याअंतर्गत अन्नधान्यांमध्ये होणारी भेसळ, मॉल, दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूटमार व इतर ठिकाणी ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई झाली का नाही? याबाबत राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे पाठपुरावा केला जातो. तसेच ग्राहक हिताच्या दृष्टीनेही समितीतर्फे शासनाने नेमके काय धोरण ठरविले पाहिजे, याविषयी सूचित केले जाते.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रमोद भामरे, तहसीलदार अमोल मोरे, अपर तहसीलदार ज्योती देवरे आदी उपस्थित होते. प्रशासनाची भूमिका महत्त्वाची!ग्राहक हिताच्या दृष्टीने शासनातर्फे जे काही निर्णय होतात, त्याविषयी माहिती प्रशासनातर्फे सर्वसामान्य नागरिकांना देणे गरजेचे आहे. शासन व ग्राहक यांच्यातील मधला दुवा म्हणजे प्रशासन होय. ग्राहकांना जागरूक करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही देशपांडे म्हणाले. ग्राहक जागृती कार्यक्रम राबविणार!ग्राहक हिताच्या दृष्टीने राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीतर्फे ग्राहक जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या तरतुदींनुसार ग्राहकांना अपेक्षित असलेली सेवा देणे विक्रेत्यांचे कर्तव्य आहे. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.