शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 22:49 IST

कापडणे : जलपातळी दिवसेंदिवस खोल-खोल, गुरांच्या पाणी, चाऱ्याचा प्रश्न बिकट

कापडणे : पाणी नसल्यामुळे शेतातील मक्यासह चारावर्गीय पिके करपत आहेत. चाराटंचाईमुळे पशुधन कसे वाचवावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात. तसेच चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकºयांनी कुपनलिका व विहिरीतील जलपातळीचा अंदाज घेऊन उन्हाळी हंगामात पशुधन जीवंत ठेवण्यासाठी चारावर्गीय पिकांचा पेरा केला. मात्र, विहिरीच्या व कुपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होताना दिसत आहे.काही शेतकºयांनी पाण्याचे नियोजन करून भाकड व दुधाळ जनावरांसाठी चारा उत्पादन करण्यासाठी मका पिकाची थोड्याफार प्रमाणात लागवड केलेली आहे. मात्र, ऊन्हाचा तडाखा जास्त बसत असल्याने विहिरींच्या जलपातळीत जलद गतीने घट होत आहे. विहिरींची जलपातळी आटल्याने विविध शिवारातील पिके करपून गेली आहेत. यामुळे शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.कापडणे येथील जाणकार शेतकºयांच्या मते यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकºयांपुढे पशुधन वाचविण्याचे आव्हान उभे आहे. पाणी व चाराटंचाईमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.सलग तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पर्जन्यमान कमी होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खूपच खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच शिवारातील पिके व गुरांसाठी पाण्याची उपलब्धता कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहेत.पाणी व चाराटंचाईमुळे गुरांची विक्रीसद्यस्थितीतच दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक होणार आहे. सध्या शेतकºयांकडे साठविलेला चारा संपत आल्याने शेतकºयांनी आता भाकड जनावरांसोबत दुधाळ जनावरे देखील अत्यल्प दरात विक्रीला काढली आहेत.पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने ताबडतोब उपाययोजना करावी. तसेच चारा छावण्या उभाराव्यात, अशी मागणी कापडणे येथील शेतकरी जयवंत बोरसे, राजेंद्र बोरसे, सुनील पवार, नथू माळी, देविदास खलाणे, अनिल माळी, नारायण माळी, मच्छिंद्र बोरसे, पितांबर पाटील, उज्वल बोरसे, अरुण पाटील, अरविंद पाटील, भिला बोरसे, भटू बोरसे, पंकज बोरसे आदींनी केली आहे.

टॅग्स :Dhuleधुळे