शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिनेश गायकवाडचे चंद्रपुरपर्यंत धागेदोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 17:38 IST

तपासातून बाब उघड : अद्यापही संशयित फरार

ठळक मुद्देघटना घडल्यापासून संशयित दिनेश गायकवाड फरार आहे़ त्याचा शोध पोलीस घेत असून तो अद्याप सापडलेला नाही़ या प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे करीत आहेत़ चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे घडलेल्या गुन्ह्यात दिनेश गायकवाड हा संशयित पोलिसांना हवा आहे़

त्याच्या चौकशीतून दिनेश गायकवाड याचे नाव समोर आले़ त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी धुळे तालुक्यातील शिरुड येथे आलो असता तो पळून गेला, अशी माहिती गोंडपिंपरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी ‘लोकमत’शी दिली़ चंद्रपुर जिल्ह्यात विदेशी दारु आढळल्यामुळे एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले़ ९ आॅगस्ट रोजी याप्रकरणी गोंडपिंपरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ प्राथमिक चौकशीतून धुळे तालुक्यातील शिरुड येथील दिनेश निंबा गायकवाड याचे नाव समोर आले़ त्यामुळे त्याला चौकशीकामी ताब्यात घेण्यासाठी गोंडपिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देवाजी बोरकुटे आपल्या पोलीस पथकासह शिरुड (ता़धुळे) येथे आले होते़ शिरुड शिवारातील नाना श्यामजी पाटील यांच्या शेतात रविवारी सकाळी ८ ते साडेआठ वाजेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यापुर्वी काही जणांनी वाद घातला़ शासकीय कामात अडथळा आणला़ वाद घालत असतानाच दिनेश गायकवाड याला पळून जाण्यास मदत केली़ त्यामुळे रविवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली़ त्यानुसार दिनेश निंबा गायकवाडसह प्रविण निंबा गायकवाड, बंडू निंबा गायकवाड आणि सोपान परदेशी (सर्व रा़ शिरुड ता़ धुळे) यांच्याविरुध्द संशयावरुन भादंवि कलम ३५३, १८६, ३३२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे़