धुळे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या बाधित रूग्णांवर योग्य तपासणीसह औषधोपचार होण्यासाठी जिल्हा रूग्णालयातील कोविड कक्ष कार्यान्वित करण्याचे आदेश आमदार डॉ. फारूख शाह यांनी दिले आहेत. आमदार शाह यांनी जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी आमदार शाह यांनी रुग्णालयातील लसीकरण विभागासह सर्वच विभागांची पाहणी करत तेथे सुरु असलेल्या सिटी स्कॅन मशीनचीही पाहणी केली. धुळे शहरातील रुग्णांच्या सोईसाठी तत्काळ कोरोना तपासणी करा व तत्काळ त्याचा अहवाल कळविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी जिल्हा रूग्णालयात ६५ बेडचा कोविड कक्ष कार्यान्वित असल्याची माहिती दिली.
यावेळी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय शिंदे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. महेश भडांगे, डॉ. रवी सोनवणे, डॉ. दिनेश दहिते, प्रतिभा घोडके, निमोणकर, दीपाली मोरे, कक्षसेवक अनुपमा लोंढे, चंद्रकांत काटे, नरेंद्र शिंदे, कल्पेश बागुल, दीपाली गिरमकर सलीम अन्वर शाह, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, आसिफ पोपट शाह, सेहबाज शाह, आदी उपस्थित होते.