शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस भरती प्रक्रियेवरुन मनपा महासभेत नगरसेवक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:31 IST

कारवाई मागणी : एस.सी. व एस.टी. प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप

धुळे : महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेत एस.सी., एस.टी. प्रवर्गासाठी राखीव जागेवर नियमानुसार भरती न करता अधिकाऱ्यांनी बोगस भरती केली. या बोगस भरती प्रक्रियेमुळे एस.सी., एस.टी. प्रवर्गावर अन्याय झाला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी खुलासा द्यावा, अशी मागणी नगरसेवक नागसेन बोरसे यांनी केली.महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात मंगळवारी महापालिकेची महासभा घेण्यात आली. यावेळी विषय पत्रिकेवरील १३ विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी १३ विषयांवर चर्चा होऊन एकमताने विषय मंजूर करण्यात आले. दरम्यान, सभेत गैरहजर राहणारे सदस्य तसेच विकास कामांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.बोगस भरतीची चौकशी करा१९७६ मध्ये महापालिकेत झालेल्या भरती प्रक्रियेत एस़टी़, एस.सी़ राखीव पदावर जागेवर मनपा आस्थापना विभागाचे नारायण सोनार यांची भरती तीन वर्षासाठी तात्पूर्ता स्वरूपासाठी करण्यात आली होती़ त्यांची बढती होऊन त्यांना आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्त करण्यात आले़ अधिकाऱ्यांनी पात्रता नसतांना सोनार यांची भरती व बढती केली आहे़ भरती प्रक्रियेची चौकशी होण्याची वारंवार मागणीही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगसेवक नागसेन बोरसे यांनी केला़ सोनार यांची भरती प्रक्रि येची माहिती घेऊन पुढील बैठकीत खुलासा केला जाईल असे आयुक्त अजिज शेख यांनी सांगितले़म्हणून गोसावीनी मारली दांडीकचरा संकलन करणाºया ठेकेदाराकडून वारंवार महापालिकेच्या कराराचे उल्लंघन होत असल्याने त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी गेल्या २ सभेपासून नगरसेवक शितल नवले यांनी लावून धरली आहे़ ८ ते १० महिन्यापासून वॉटर ग्रेस कंपनीच्या ठेकेदाराकडून घंटागाडीना जीपीएस प्रणालीनुसार मार्ग, थांबे, तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था झालेली नाही़ याबाबत उपायुक्त शांताराम गोसावी यांच्याकडे १५ दिवसांपूर्वी पत्र दिले होते़महासभेत पुन्हा कचरा ठेकेदाराचा प्रश्न उपस्थित होईल़ म्हणून गोसावीनी दांडी मारली असा आरोप नगरसेवक नवले यांनी केला़हेमा गोटे यांचे पद रद्द करामहासभेत वारवांर गैरहजर राहणाºया माजी आमदार अनिल गोेटे यांच्या पत्नी हेमा गोटे यांचे नगरसेवक रद्द करण्याची मागणी दोन ते तीन महासभेपासून नगरसेवक हिरामन गवळी यांनी लावून धरली आहे़ यावर खुलासा करतांना नगरसचिव मनोज वाघ यांनी हा विषय महापौर चंद्रकांत सोनार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे़ योग्य निर्णय पुढच्या सभेत घेण्यात येणार असल्याचे सांगितले़शाहू नाट्य मंदिर प्रश्न गाजलानाटयप्रेमींना व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी मनपाने शाहू महाराज नाट्य मंदिर उभारले आहे़ या मंदिराचा ठेका २०१३ पासून कोणत्या कंपनीला किती वर्षासाठी व भाड्यापोटी किती रूपये मनपाकडे जमा झाले आहे़ याबाबत चौकशीची मागणी उपमहापौर कल्याणी अंपळकर, नगरसेवक सुनिल बैसाणे यांनी केली़त्या ठेकेदारावर कारवाई करामाजी आमदार गोटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाºया पांझरा नदीकाठावरील रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता ऐजाज शाह यांनी विकास कामामध्ये अडथडा ठरणारे १० ते १२ शौचालय पाडले आहे़ त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे़ मनपाने त्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच शौचालयाचे बांधण्यात यावी अशी मागणी नगरसेवक भगवान गवळी यांनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे