डोस देण्यात आले
निजामपूर-साक्री तालुक्यात जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत निजामपूर येथे "कोरोना लस आपल्या दारी" या मोहिमेस बुधवारपासून सुरुवात झाली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
निजामपूरच्या वाॅर्ड क्र.५ पासून कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. या वाॅर्डात अल्पसंख्याक, आदिवासी, अनु. जाती समाज आहे. आधी त्यांची जनजागृती करण्यात आली. वाॅर्डातील काहींनी लसीचा पहिला व दुसरा डोस घेतला. जैताणे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश वसावे, उपकेंद्र समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मोहम्मद अनस अन्सारी, ग्रामपंचायत सदस्य ताहीर बेग मिर्झा, आरोग्य सहा. प्रवीण सोनार, आरोग्यसेविका एस.बी. चव्हाण, आरोग्यसेवक सी.जे. सोनवणे, आशावर्कर योगिता खेडेकर, डी.वाय. वानखेडे, दीपाली शिरसाठ आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
या वाॅर्डात ५८ लाभार्थींनी पहिला डोस, तर ३२ लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. एकंदर ९० डोस देण्यात आले.