धुळे : जिल्ह्यातील आणखी दोन जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन्ही बाधित रुग्ण साक्री तालुक्यातील आहेत. साक्री व पिंपळनेर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. बुधवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील ९१ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २१ अहवाल निगेटिव्ह आले. भाडणे कोविड केंद्रातील त्यात ५१ अहवाल निगेटिव्ह आले. तर तेथील रॅपिड अँटिजन टेस्टचे दोन अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, स्वामी सोसायटी साक्री १ व पिंपळनेर ग्रामीण रुग्णालय येथील एकाचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मुकटी ५०, बोरिस येथील १६ अहवाल निगेटिव्ह आले. वैद्यकीय महाविद्यालयातील १३ अहवाल निगेटिव्ह आले. एसीपीएम महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतील १८ अहवाल निगेटिव्ह आले. तर खासगी प्रयोगशाळेतील ११ अहवाल निगेटिव्ह आले.
साक्री तालुक्यातील दोघांना कोरोना संसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:23 IST