शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जि.प., मनपा मधील ठेकेदारी व राजकीय संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 13:12 IST

या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये अंर्तगत वाद सुरु

राजेंद्र शर्माजिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत, तसेच स्थायी समिती व बांधकाम समितीच्या सभेत आयत्यावेळेला आर्थिक धोरणात्मक निर्णय घेतले जात नाही. पण सत्ताधारी भाजपने या सभांमध्ये आयत्यावेळी आर्थिक धोरणात्मक निर्णय घेतल्याचा आरोप करीत विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे यांनी शासनाकडे अपील दाखल केले होते. तेव्हा अपिलाची चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत सभेत आयत्यावेळी मंजूर केलेली कामे सुरु करु नये, असे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले होते. परंतू तरीसुद्धा ही कामे सुरु होती. तेव्हा पोपटराव सोनवणे यांनी पुन्हा शासनाकडे सीईओ यांची खातेनिहाय चौकशी लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सीईओ यांनी ही सर्व कामे थांबविण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले. दरम्यान, जिल्हा परिषदेत कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा कामांची माहिती देऊन जि.प.अध्यक्ष तुषार रंधे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच सोनवणे यांच्याविरोधात अबु्र नुकसानीचा दावा आणि सभागृहातील व सभागृहाबाहेरचे त्यांनी केलेले गैरवर्तन लक्षात घेता त्यांनाच अपात्र करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. हा वाद सुरु असतांनाच दुसरीकडे जिल्हा परिषदेतील केवळ काल्पनिक कामे करुन निधी उकळला जात असल्याचा आरोप करीत जि.प.च्या सदस्या सुनिता सोनवणे व त्यांचे पती शानाभाऊ सोनवणे यांनी चौकशीची मागणी केली. तेव्हा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. या दोन्ही प्रकरणामुळे ठेकेदारीच्या अवतीभवतीच जिल्हा परिषदेचे राजकारण फिरत असल्याचे स्पष्ट होते. हे प्रकरण सुरु असतांना जि.प.च्या बांधकाम व अन्य विभागातील काही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर देखील पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकारात आपला सहभाग नको म्हणून स्वत:हून आपली बदलीही करवून घेतली होती. त्यामुळे सुद्धा या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असली तरी आज जे भाजपतर्फे सत्तेत आहे ते काही काळापूर्वी काँग्रेस सत्तेत असतांनाही सत्ता भोगीतच होते. जि.प. निवडणूकपूर्वी ते भाजपमध्ये जाऊन निवडून आले. त्यामुळे ते आजही सत्तेतच आहे. तर आज जे विरोधात आहे. ते काँग्रेसमध्ये असतांना याच लोकांचे मित्र होते. पण आता एकमेकांच्या आमने-सामने उभे आहेत. त्यांना एकमेकांविरोधात बोलतांना पाहून साहजिकच आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तेव्हा या प्रकरणाला राजकारणाचाही स्पर्श असल्याचे जाणवते. पण जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याची चौकशी लवकर आणि प्रामाणिकपणे झाली पाहिजे, तेव्हा यात कोण किती गुरफटलेला आणि कोण किती धुतल्या तांदळाचा आहे, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. तसेच आधीच वाघ बापू भ्रष्टाचार प्रकरणाने बदनाम झालेल्या धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा नवीन डाग लागू नये, अशी रास्त अपेक्षा धुळेकरांची आहे. मनपातील ठेकेदारी- जिल्हा परिषदेपाठोपाठ धुळे महानगरपालिकेतही ठेकेदारांची बिले काढल्यासंदर्भात सत्ताधारी पक्षाचेच नगरसेवक शितल नवले यांनी महापालिकेबाहेर धरणे आंदोलन केले. मनपा प्रशासनाने कोरोना काळात २००८ सालातील पावणेतीन कोटीची ठेकेदारांची बिले काढली. मात्र जनतेच्या हिताची सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, पाणी आणि स्वच्छता या मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी पैसा देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नवले यांनी सत्ताधाºयांना घरचाच आहेर दिला. मनपातील ठेकेदारी ही थेट अधिकाºयापासून नेत्यापर्यंत सर्वांकडून पोसली जाते. मनपातील काही अधिकारी आणि नगरसेवक हे नातेवाईकांच्या नावाने कामाचे ठेके घेतात हे सर्वांना माहिती आहे. जिल्हा परिषदेप्रमाणेच याठिकाणीही ठेकेदारांच्या अवतीभवतीच मनपाचे राजकारण फिरत असते. या आंदोलनामुळे मनपाकडे निधी असून सुद्धा शहरातील रस्ते आणि विकास कामे बंद का आहेत, हा नवले यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य आहे. शहरात पावसामुळे कॉलनी परिसरातील रस्त्यांची पार दैना झाली आहे. नागरिकांना रस्त्यावरुन पायी चालणे देखील कठीण झाले आहे. त्यांची दुरुस्ती आवश्यक असतांना ते काम केले जात नाही. अनेक विकास कामे मंजूर आहे, पण निधीअभावी ते कामे होत नाही, असे सांगितले जाते. मग ती कामे या निधीतून करता आली असती, नवलेंचे हे म्हणणे रास्त वाटते. पण सत्तेत असतांना आपले म्हणणे ते आपल्या पदाधिकारी व अधिकाºयांना पटवून देऊ शकले असते, मग त्यात नवले कुठे कमी पडले की त्यांचे त्यांनी ऐकून घेतले नाही म्हणून त्यांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला, हाही प्रश्न आहे. एकूणच या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये अंर्तगत वाद सुरु असल्याचे दिसते.

टॅग्स :Dhuleधुळे