शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

धुळ्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 22:57 IST

२८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी : विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल

धुळे : इयत्ता अकरावीसाठी शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रवेश अर्ज स्वीकारल्यानंतर विज्ञान शाखेसाठी २७ किंवा २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.महाराष्टÑ राज्य परीक्षा मंडळामध्ये मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. जिल्ह्यातील २८ हजार ३६ पैकी २१ हजार ६१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा निकाल ७७.११ टक्के लागला. दरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध लागले होते. गुरूवारी परीक्षा मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळताच, शुक्रवारपासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झालेली आहे.घोगरे महाविद्यालयएस.एस.व्ही.पी.एस. संस्थेच्या डॉ. पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालयात २१ पासून विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज जमा करण्यास सुरूवात झालेली आहे. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज जमा करण्यात येतील. त्यानंतर २८ रोजी सायंकाळी ४ वाजता पहिली संवर्गनिहाय गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. २९ जून ते २ जुलै दरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. यानंतर दुसरी, तिसरी प्रतीक्षा यादी जाहीर करून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या ४२० जागा आहेत. प्रवेशापासून कोणीही वंचीत राहणार असे प्राचार्य एम.व्ही. पाटील यांनी सांगितले. दरम्यान या महाविद्यालयात कला शाखेच्या ६० व वाणिज्य शाखेच्या १८० जागा असून, त्यांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती प्राचार्य एम.पी. पाटील यांनी दिली.झेड.बी.पाटील महाविद्यालययेथेही इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या अनुदानित २४०, विना अनुदानितच्या १२० तसेच वाणिज्य शाखेच्या अनुदानित १२० व विना अनुदानितच्या १२० जागा आहेत. तर कला शाखेच्या १२० जागा उपलब्ध आहेत. विज्ञान शाखेसाठी २८ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल, असे महाविद्यालयातून सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे