शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

तत्त्वज्ञान केंद्राचे बांधकाम काढले

By admin | Updated: February 28, 2017 23:49 IST

महसूल विभागाची कारवाई : दोन महिन्यांपूर्वी दिला होता इशारा, रस्त्याचे काम प्रस्तावित

धुळे : शहरातील लहान पुलाजवळील सावरकर पुतळ्यासमोर असलेले डॉ़ बाबासाहेब आंबेडकर बौद्ध तत्त्वज्ञान केंद्राचे बांधकाम मंगळवारी महसूल विभागातर्फे काढण्यात आल़े या वेळी केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर उपस्थित होत़ेपांझरा नदीपात्राच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी साडेपाच कि.मी.चे रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.  या रस्त्याला अडथळा ठरत असलेले तत्त्वज्ञान केंद्र स्वत:हून काढून घेण्याची घोषणा केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर यांनी केली होती़ त्यानुसार केंद्राचा काही भाग याआधीच हटविण्यात आला होता़ त्यानंतर आमदार अनिल गोटे यांनी वाल्मीक दामोदर यांचा जयहिंद महाविद्यालयासमोर 1 जानेवारीला झालेल्या जाहीर सभेत सत्कार केला होता़ मात्र त्यानंतर दोन महिने उलटूनही तत्त्वज्ञान केंद्राचे उर्वरित बांधकाम काढण्यात आले नव्हत़े  मंगळवारी अपर तहसीलदार ज्योती देवरे या पथकासह सकाळी 11 वाजता तत्त्वज्ञान केंद्रात दाखल झाल्या असता या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आल़े त्यामुळे देवरे यांनी तत्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल़े त्यानुसार केंद्राचे अध्यक्ष वाल्मीक दामोदर यांच्या उपस्थितीतच अतिक्रमण काढण्यात आले.  या केंद्राच्या मागील बाजूस महापालिकेने सार्वजनिक शौचालये उभारली असून तीदेखील हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े त्याबाबत तहसीलदारांनी चार ते पाच वर्षापूर्वीच आदेश दिले होत़े त्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती़ शासकीय जागेवरील संपूर्ण अतिक्रमण काढले जाईल, असे अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केल़े