शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

काँग्रेस - राष्टÑवादीची अस्तित्वाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 13:36 IST

जि.प. व पं.स.निवडणूक : अमरिशभाई, दहितेंच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील

धुळे : धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. ७ जानेवारी २०२० रोजी ५६ गट व ११२ गणांसाठी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसचे माजी आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषदेतील मातब्बर नेते भाजपमध्ये गेल्याने यंदाची जिल्हा परिषद निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील. भाजपचे वर्चस्व वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेस - राष्टÑवादीसाठी जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.धुळे जिल्हा परिषदेवर स्थापनेपासूनच मधले अडीच वर्ष वगळता सतत काँग्रेसची अबाधित सत्ता राहिली आहे. गेल्या निवडणुकीसुद्धा काँग्रेस - राष्टÑवादीचीच सत्ता जिल्हा परिषदेवर होती. काँग्रेसचे शिवाजीराव दहिते हे अध्यक्ष होते.अमरिशभाईचा भाजप प्रवेशविधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे माजी आमदार व नेते अमरिशभाई पटेल यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शिंदखेड्यात डॉ.हेमंत देशमुख गटातील मातब्बर नेतेमंडळीने भाजपमध्ये प्रवेश केला. ृतर काँग्रेस आघाडीतील मित्रपक्ष राष्टÑवादीचे प्रमुख नेते माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनीसुद्धा राष्टÑवादी पक्षाचा राजीनामा दिल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.दोन्ही पक्षाची अशी बिकट परिस्थिती असतांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. ही निवडणूक म्हणजे काँग्रेस - राष्टÑवादी पक्षासाठी आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी लढावी लागणार आहे. काँग्रेसकडे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष शाम सनेर हे दोन नेते प्रमुख आहेत. राष्टÑवादीत जिल्हाध्यक्ष किरण शिंदे आणि माजी जि.प.सभापती किरण पाटील, माजी अध्यक्ष संदीप बेडसे आहेत. या सर्वच नेत्यांना आपली प्रतिष्ठापणाला लावून ही निवडणूक लढावी लागणार आहे.या निवडणुकीत शिवसेना ही आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे. परंतू गेल्या जिल्हा परिषदेतील निकाल पाहता शिवसेना आघाडीसोबत गेलीतरी फारसा फरक पडणार नाही, असे आजतरी वाटते. एकूणच काँग्रेस - राष्टÑवादी आणि शिवसेना सोबत आल्यास महाशिवआघाडीतील नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.भाजपचे वर्चस्व वाढलेदुसरीकडे भाजपचे राजकीय वर्चस्व निश्चित वाढले आहे. भाजपकडे माजी मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्यासह नव्याने दाखल झालेला माजी आमदार अमरिशभाई पटेल यांचा अँकर गट यामुळे आजतरी चारही तालुक्यात भाजपचे वर्चस्व आघाडीपेक्षा जास्त दिसते. त्यामुळे यंदाच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील राजकीय गणित बदलतील, असे आजतरी दिसते.त्यात आता जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण निघाले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. अनेक दिग्गज या निवडणुकीत आपले नशिब अजमाविण्यासाठी रिंगणात उतरतील. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार आहे. निवडणुकीच्या दृष्टीने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे