शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ‘बुस्टर’ डोसची गरज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:51 IST

धुळे : खासदार शरद पवारांनी दिला होता कानमंत्र

राजेंद्र शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. परंतू भाजपने याला सुरुंग लावून गेल्या दोन पंचवार्षिकपासून धुळे लोकसभेवर आपला कब्जा अबाधित  ठेवला आहे. आता आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हा मतदारसंघ काबीज करण्याची संधी आहे. जिल्ह्यात आजही काँग्रेस- राष्टÑवादीची प्रामाणिक आघाडी आहे. जिल्ह्यात जर आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन काम केले तर आपल्याला सहज यश मिळेल, असा कानमंत्र राष्ट्रवादीचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या आधी आयोजित एका जाहीर कार्यक्रमास दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिला होता. तरीही नुकत्याच डिसेंबर महिन्यात झालेल्या धुळे महापालिका निवडणुकीत मात्र या आघाडीला पराभव पत्कारावा लागला. राष्टÑवादीला महापालिकेतील  आपली १० वर्षापासूनची अबाधित सत्ता गमवावी लागल्याने आघाडीत बिघाडी झाली की काय, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पण आजही काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीची धुळे - नंदुरबार जिल्हा बँक आणि जिल्हा परिषदेत सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीचे जिल्ह्यात आपले वेगळे राजकीय वर्चस्व आहे, हे कोणीही मान्य  करणार. आता आघाडीला पुन्हा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची   संधी आगामी लोकसभा निवडणुकीत मिळाली आहे. दिग्गज नेत्यांची मांदियाळी : जिल्ह्यात काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीत माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी मंत्री व आमदार अमरिशभाई पटेल, राष्टÑवादीचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, आमदार कुणाल पाटील, आमदार डि. एस. अहिरे, आमदार काशिराम पावरा यांच्यासह तरुण नेतेमंडळीची साथ आहे. अशा दिग्गज नेत्यांची मांदियाळी आघाडीत आहे. यासर्वांनी एकत्र येऊन एकजुटीचा फायदा आघाडीला मिळणार आहे. एकूणच आगामी लोकसभा निवडणुकीत या सर्व दिग्गजांची शक्तीपणाला लागणार आहे. या सर्व नेतेमंडळीसह संपूर्ण आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाºयांना प्रोत्साहीत करण्याची गरज आहे.  काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष खासदार राहूल गांधी यांच्या सभेने  काँग्रेस आणि आघाडीला बुस्टर मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात आघाडीची सत्ता स्थानेखासदार -                                               १० वर्षापासून नाहीआमदार -                                                ३महानगरपालिका -                                     नाहीपंचायत समिती -                                      ३नगरपालिका -                                          १नगरपंचायत -                                           १

टॅग्स :Dhuleधुळे