शासनाच्या आदेशानुसार सध्या केवळ ४५ वर्षांवरील वयोगटासाठी दुसरा डोस देण्यात येत आहे़ यासाठी गुरुवारी शहरात ९ केंद्रांवर कोविशिल्ड आणि महापालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्रात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येत आहे़ प्रत्येक केंद्रावर केवळ १०० डोसच उपलब्ध होते़ असे असताना प्रत्येक केंद्रावर ३०० ते ४०० जणांची गर्दी झाली होती़ त्यात महापालिकेच्या जुन्या इमारतीत असलेल्या केंद्रातही मोठी रांग लागलेली होती़ येणाऱ्या नागरिकांना टोकणनुसार लस दिली जात होती़ मात्र, त्याचवेळेस मागचे पुढे गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला़ आरडाओरड झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती़ गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्याची वेळ ओढवली़ त्यानंतर तणावाचे वातावरण शांत करीत परिस्थिती हाताळत लसीकरण सुरळीतपणे सुरू झाले़ काही काळ झालेल्या गर्दीमुळे मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मात्र पूर्णपणे फज्जा उडालेला असल्याचे दिसून आले़
चौकटसाठी
महापालिकेच्या जुन्या इमारतींमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी महपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी धाव घेतली़ केवळ १०० लस उपलब्ध असल्यामुळे टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येत होता़ सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना अचानक पाठीमागून येऊन पुढे जाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे शाब्दिक चकमक उडाली होती़