धुळे : कोरोनामुक्त झालेल्या जेष्ठ नागरिकांमध्ये फ्रायब्रोसिस या फुफ्फुसाच्या आजाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांना काही त्रास झाल्यास पोस्ट कोविड ओपीडीत अशा रुग्णांची तपासणी करण्यात येते. पोस्ट कोविड ओपीडीत फुफुसाच्या विकारांची तक्रार असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात दोन पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत . याठिकाणी आतापर्यंत १४९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे . कोरोनामुक्त झाल्यानंतरही काही रुग्णांना पुन्हा त्रास होतो , अशा रुग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत . साक्री रोड परिसरातील जुने जिल्हा सामान्य रुग्णालय व भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू झाल्या आहेत . जिल्ह्यातील १३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . कोरोना आजारातून बरे झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना पुढील काही महिन्यांपर्यंत थकवा जाणवतो. तसेच लकवा , छातीत दुखणे असा त्रास रुग्णांना होत असतो. त्यात आता फुफ्फुसाचे विकार उदभवणाऱ्या रुग्णांची भर पडली आहे.जिल्ह्यात काही दिवसापासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. थंडीमुळे देखील अशाप्रकारचा त्रास उदभवतो. तसेच धाप लागणे, दमा, आदी रुग्णांमध्ये वाढ होत असते.वृद्ध नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवीकोरोनावर मात केलेल्या रुग्णांपैकी वृद्धांना फ्रायब्रोसिस विकारासोबतच थकवा जाणवणे, दम लागणे आदी विकार उद्भवत आहेत. तसेच थंडी वाढल्यामुळेही जेष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असलेल्या जेष्ठानी त्यांची औषधे नियमित घ्यावीत. योगासने, प्राणायाम व हलक्या स्वरूपाचा व्यायाम करावा.
कोरोनामुक्त ज्येष्ठ नागरिकांमध्ये फ्रायब्रोसिसच्या तक्रारी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 12:22 IST