शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वेतन पथक विभागाविषयी उपसंचालकांकडे तक्रार

By admin | Updated: January 18, 2017 23:39 IST

शिक्षक समन्वय समिती : आर्थिक कामांमध्ये अडवणुकीचा आरोप

धुळे : माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वेतन पथक विभागातील अनियमिततेविषयी जिल्हा शिक्षण क्षेत्र संघटना समन्वय समितीच्या वतीने शिक्षण उपसंचालक नाशिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी  प्रवीण पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.समन्वय समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे        की, धुळे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांच्या वेतन पथकाबाबत अनेक लेखी व तोंडी तक्रारी समन्वय समितीकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे वेतन पथक अधीक्षक नितीन पाटील यांच्यासंदर्भात आलेली तक्रारींची तत्काळ दखल घेण्यात यावी. वेतन पथकाकडे कर्मचा:यांच्या आर्थिक कामांमध्ये मुद्दामहून टाळाटाळ केली जाते. सन 2013-14 चे अतिरिक्त शिक्षकांचे शालार्थ आय.डी. नसल्याने वेतन रखडले आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समावेशन झाल्यानंतर शिक्षणाधिकारी यांना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन अदा करण्याचे आदेशित केल्यावरदेखील वेतन अदा करत नाहीत. वेतन अधीक्षक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात सुयोग्य समन्वय नसल्याने समस्यांची लवकर सोडवणूक होत नाही. वेतन पथक विभागाच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास व कार्यालयाची चौकशी न झाल्यास समन्वय समितीने 1 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती धुळे जिल्हा समन्वय समिती समन्वयक संजय एल.      पवार, वि.मा. भामरे, मदनलाल मिश्रा, एस.बी. सूर्यवंशी, विजय बोरसे, बी.डी.भदोरिया, बी.ए.पाटील, महेश मुळे, एस.आर. देशमुख, जे.बी.पाटील, अशपाक खाटीक, आनंद पवार, लतीफ देशमुख, के.बी.नांद्रे, ए.बी. सोनवणे, सुनील पवार, आर.व्ही. पाटील, हेमंत ठाकरे, प्रा.डी.पी. पाटील, देवानंद ठाकूर, लोटन मोरे, विलास पाटील आदींनी दिली       आहे.संघटनेच्या वतीने खोटे आरोप करून व खोटी कागदपत्रे सादर करून समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. संघटनेच्या नावाखाली दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिक्षक व कर्मचा:यांची कामे मार्गी लावण्यासाठी नेहमीच आमचे प्रयत्न असतात.-नितीन पाटील, वेतन पथक अधीक्षक, माध्यमिक विभाग