शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

संवाद, समन्वयातूनच होऊ शकते सकारात्मक वाटचाल : संडे स्पेशल मुलाखत - डॉ़ राजू भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 11:59 IST

धुळे : संघटीत गुन्हेगारी वाढणार नाही याकडे लक्ष देत असताना महिला आणि मुली यांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल़    - डॉ़ राजू भुजबळ

ठळक मुद्देdhule

संडे स्पेशल मुलाखत  देवेंद्र पाठक

 धुळे :नक्षलग्रस्त भागात यशस्वी कामगिरी केल्यानंतर विविध जिल्ह्यात कामांचा ठसा उमटवून धुळ्यात अपर पोलीस अधीक्षक या महत्वाच्या पदावर डॉ़ राजू भूजबळ अलीकडेच रूजू  झाले आहेत़ संवाद आणि समन्वयातून प्रश्न निकाली निघू शकतात़ त्यातून सकारात्मक वाटचाल होऊ शकते, अशी आशा डॉ़ भुजबळ यांना आहे़ त्यांना आपला पदभार स्विकारुन तब्बल दीड महिना झाला आहे़ त्यांच्याशी पोलिसांविषयी ‘लोकमत’ने संवाद साधला़ प्रश्न : धुळ्यात रुजू झाल्यानंतरचा आपला आजवरचा अनुभव कसा राहिला आहे?डॉ़ भूजबळ : धुळे शहर तसे चांगलेच आहे़ नवीन असल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील क्राईमसंदर्भातील अभ्यास करत आहे़ गुन्हेगारांचा बेसिक मुद्दा समजून घेत तो निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे़ प्रश्न : नक्षलग्रस्त भागात काम केल्यानंतर आपला अनुभव कसा राहिला?डॉ़भुजबळ : नक्षलग्रस्त आणि अन्य भाग यांच्यात काम करण्याची पध्दत वेगळीच असते़ क्राईमच्या घटनांपेक्षाा त्या भागात सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही याकडे कटाक्षाने पाहण्यात येते़ अन्य शहरी भागात औद्योगिक आणि शहरी भागाचा विस्तार वाढता असल्यामुळे याठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात़  प्रश्न : गुन्हेगारी रोखण्यासाठी आपणाकडे काही नियोजन आराखडा आहे का?डॉ़ भुजबळ : गुन्हेगारी ही धुळ्याची असो वा कोणत्याही शहराची ती मोडीत काढण्याची जबाबदार यशस्वीपणे सांभाळणे फारच महत्वाचे आहे़ गुन्हे, घटना लक्षात घेऊन वातावरणानुसार त्याची सोडवणूक केली जाणे फार महत्वाचे आहे़ शहराबद्दलची माहिती येथे येण्यापूर्वी संकलित केली आहे़ आता नव्यानेच पदभार स्विकारला आहे़ येथील क्राईमसंदर्भातील घटना, घडमोडी समजून घेत न्याय देण्याचा प्रयत्न राहिल़ 

संघटीत गुन्हे रोखणारव्यक्तिगत वाद आणि त्यातून घडणाºया क्राईमच्या घटना कोणीही रोखू शकत नसलेतरी अन्य क्राईम मात्र रोखण्यासाठी कटाक्ष राहणार आहे़ त्यात प्रामुख्याने संघटीत गुन्हेगारीवर वचक निर्माण केला जाईल़ ती मोडीत कशी काढता येईल याकडे देखील तितक्याच गांभीर्याने पाहिले जाईल़ त्याचे प्रमाण वाढल्यास गुन्हेगारींचे प्रमाण अधिकच वाढू शकते़ त्यामुळे संघटीत गुन्हेगारी कमी करणे, ती वाढू न देणे याची दक्षता घेतील जाईल़ शांतता अबाधित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले़  

टॅग्स :Dhuleधुळे