शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

समिती सदस्यांकडून ‘स्वच्छते’ची पाहणी!

By admin | Updated: January 21, 2017 00:04 IST

धुळे : स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरातील विविध भागांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल झाल़े

धुळे : स्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत शहरातील विविध भागांची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी केंद्रीय पथक शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दाखल झाल़े प्राथमिक बैठकीनंतर त्यांनी पाहणी करण्यास सुरुवात केली़ त्याच वेळेस काही सदस्यांनी कागदपत्रेही तपासली़ दरम्यान, समिती शनिवारी शहरातील स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितल़े महापालिकेने नोव्हेंबर 2016 या महिन्यापासूनच स्वच्छतेच्या तयारीला सुरुवात केली होती़ स्वच्छ महाराष्ट्र सव्रेक्षणांतर्गत सहभाग घेतला होता़ या आनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती शुक्रवारपासून दोन दिवसांच्या दौ:यावर आली आह़े समितीने सकाळी साडेदहा वाजता एकवीरादेवीचे दर्शन घेऊन कामाचा शुभारंभ केला़ दर्शन घेतल्यानंतर समिती महापालिकेत दाखल झाली़ त्यानंतर प्राथमिक बैठक घेतल्यावर समितीचे काही सदस्य प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी रवाना झाले, तर काहींनी कागदपत्र तपासणे पसंत केल़े सुरुवातीला शहरातील दसेरा मैदान परिसरात समिती दाखल झाली़ त्यानंतर पाचकंदील भागात रवाना झाली़ या वेळी मोबाइलद्वारे या ठिकाणचे फोटो काढण्यात आल़े विक्रेत्यांशीही संवाद साधत कचराकुंडी आहे का? अशी विचारणा केली़ यावर सकाळी आणि सायंकाळी कचरा संकलन होतो असे अधिका:यांकडून सांगण्यात आल़े तेथून जवळच ऊसगल्लीतील महिला शौचालयांची पाहणी करण्यात आली़ या वेळी महापालिकेचे अधिकारी दौ:यात सहभागी झाले होत़े दोन पथकांची नियुक्तीसमितीच्या सदस्यांनी दोन वेगवेगळ्या पथकाची नियुक्ती केली होती़ त्यातील पहिल्या पथकाने माधवपुरा, पेठ भाग, फिश मार्केट, पाचकंदिल परिसर, पाचकंदिल मार्केट, चर्नी रोड, देवपुरातील दत्तमंदिर परिसर, देवपुरातील भाजीपाला मार्केट, विटाभट्टी शौचालय व परिसर, लाला सरदार नगर, रमजानबाबा नगर, 80 फुटी रोड, मोहाडी उपनगरातील दंडेवालाबाबा नगर या भागाची पाहणी केली़ यावेळी समिती सदस्य संकेत गोराणे यांच्यासोबत शहर अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले सहभागी होत़े तर दुस:या पथकात यशवंत नगर, राजीव गांधी नगर, आग्रा रोड, शहर बसस्थानक, शहर पोलीस चौकी शौचालय, दसेरा मैदान परिसर, दूध डेअरी रहिवास कॉलनी, कुमार नगर भाजी मार्केट या भागाची पाहणी केली़ समिती सदस्य कमलेश मिशाह यांच्यासोबत उपायुक्त रवींद्र जाधव, ओव्हरसिअर पी़ डी़ चव्हाण सहभागी होत़े नागरीकांशी औपचारीक संवादगुणवत्ता तपासणी समितीमार्फत पाहणी करत असताना समितीच्या सदस्यांनी नागरिकांशी चर्चा केली़ जागांचे फोटो जीओ टॅगिंगद्वारे घेतल़े दरम्यान, महापालिकेत वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला होता़ 

 

केंद्रीय समितीच्या सदस्यांकडून शहरातील विविध भागांची पाहणी करण्याचे काम सुरू झाले आह़े पाहणी ही गोपनीय असून यावर लागलीच भाष्यही होऊ शकत नाही़ शनिवारी दुपारून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात येईल़ -विजय सनेर