शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

कोविड केअर केंद्रात आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:38 IST

धुळे - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड केअर केंद्र व कोविड हेल्थ केअर ...

धुळे - जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोविड केअर केंद्र व कोविड हेल्थ केअर केंद्रांवर दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोविड केअर केंद्रात येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी वाढली आहे. आओ जाओ घर तुम्हारा अशी स्थिती कोविड केअर केंद्रात झाली आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

साक्री रोड परिसरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात ३५ रुग्ण उपचार घेत आहेत. याचठिकाणी असलेल्या महानगरपालिकेच्या डेडिकेटेड हेल्थ केअर सेंटरमध्ये १० रुग्ण दाखल आहेत. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात २२०, एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात ४०, शिरपूर येथील कोविड केअर केंद्रात ६० रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्टोबर महिन्यानंतर जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे कोविड केअर केंद्रे बंद करण्यात आली होती. आता मात्र कोविड केअर केंद्रे उघडण्यात आली आहेत. काही कोविड केअर केंद्रे लवकरच उघडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोविड केअर केंद्रात रुग्णांचे नातेवाईक जात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

मनपा हेल्थ केअर सेंटर

गेटबाहेर गर्दी -

येथील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात महानगर पालिकेने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु केले आहे. ६० रुग्णांची या हेल्थ केअर केंद्राची क्षमता आहे. सध्या १० रुग्ण याठिकाणी दाखल आहेत. इमारतीच्या वरच्या मजल्यावर रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र खाली असलेल्या प्रवेशद्वाराबाहेर नातेवाईकांची गर्दी आढळली.

शिंदखेडा कोविड केअर केंद्र -

शिंदखेडा तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येथील कोविड केअर केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र कोविड केअर केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांची ये - जा वाढली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण येथे दाखल आहेत. नातेवाईकांच्या मुक्त संचारामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो.

नातेवाईकांना आत प्रवेश नाही -

जिल्ह्यातील कोविड केअर केंद्रात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याठिकाणी नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. जरी नातेवाईक आले तरी ते कोविड केंद्राबाहेरच असतात. त्यांना आत प्रवेश दिला जात नाही. कोविड केंद्रात फक्त डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश आहे.

- डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी