धुळे : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदनिमित्त शहरातील पांझरा नदी काठावरील दर्ग्यावर सामुहिक नमाज अदा करून यंदा चांगला पाऊस पडू दे, जगात सुखशांती लाभो, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली़शहरात बुधवारी ईद उल फित्र अर्थात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली़ ईद उल फित्रची विशेष नमाज अदा करण्यासाठी पहाटेपासून लहान बालकांसह पुरूष मंडळी तयार होऊन नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर पोहचले. तेथे प्रमुख मौलानांच्या मार्गदर्शनात सामूहिक नमाज अदा करण्यात आली. शहरातील अन्य मशिदींमध्येही ईद उल फित्रची सामुदायिक नमाज अदा करण्यात आली.मुस्लिम बांधवांनी परस्परांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार प्रमोद भामरे यांच्यासह देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप, रणजित भोसले, महेंद्र शिरसाठ, सय्यद बेग, संदिप पाकळे, शाम भामरे, जावेद हाजी, विशाल पाटील, राजू शेख, हर्षल पवार आदींसह राजकीय पक्ष पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या़
नदीकाठी सामूहिक नमाज अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 22:01 IST