निवडणूक आयोगाने २२ जून ते २३ जुलैपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलीस विभागाने तशी विनंती केलेली आहे.
न्यायाधीश दर्जा, बँकेचे व कॅश वाहतूक करणारे सुरक्षा कर्मचारी, सोने, चांदी व हिरे व्यापारी यांच्याकडे असलेले नोंदणीकृत सुरक्षारक्षक व नोंदणीकृत खासगी सुरक्षारक्षकांना त्यांच्याकडे असलेले शस्त्र जमा करण्याबाबत सूट देण्यात आली आहे. तसेच ज्या शस्त्र परवाना धारकांना अत्यावश्यक कारणांमुळे शस्त्र जमा करता येणे शक्य नाही, अशा शस्त्र परवानाधारकांनी ९ जुलैरोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा दंडाधिकारी तथा समिती अध्यक्ष यांच्याकडे (गृह शाखेत) स्वयंस्पष्ट कारणासह त्यांचे शस्त्र जमा का करूनये? म्हणून स्वतंत्र अर्ज समर्पक कारणांसह सादर करावा. त्यानुसार प्राप्त अर्जाबाबत छाननी समिती प्रकरण निहाय निर्णय घेईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.