शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रोज एकच उत्तरपत्रिका तपासणार

By admin | Updated: March 2, 2017 00:51 IST

शिक्षक संघटना : विविध मागण्यांसाठी असहकार आंदोलन

धुळे : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे बारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत दररोज फक्त एकच उत्तरपत्रिका तपासण्यात येईल, अशी माहिती धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आली.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची २८ फेब्रुवारी रोजी प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली. २ मेनंतर नियुक्त शिक्षकांना मान्यता देणे, कायम शब्द काढून मूल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देणे, पायाभूत पदे मंजूर करणे आदी विषयांसह शिक्षणाशी संबंधित विविध बाबींवर  चर्चा झाली. या वेळी शिक्षणमंत्र्यांनी अर्थखात्याशी संबंधित मागण्यांबाबत अर्थमंत्र्यांबरोबर येत्या ३-४ दिवसात बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले. सर्व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.ए. पाटील, सचिव प्रा.डी.पी. पाटील, प्रा.एन.टी. ठाकरे, प्रा.एस.एन. पाटील, प्रा.जी.पी. शास्त्री, प्रा.एस.डी. पाटील, प्रा.बी.एन. अहिरे, प्रा.एस.जी. शिरसाठ, प्रा.बी.बी. पाटकर, प्रा.आर.जे. पवार यांनी केले आहे.मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलऩ़जोपर्यंत मागण्यांच्या तातडीने अंमलबजावणीबाबत लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत असहकार आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. रोज फक्त एकच उत्तरपत्रिका तपासण्याचा निर्णयही त्यांनी शिक्षणमंत्र्यांना कळविला आहे. लवकरच अर्थमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन लिखित आदेश न काढल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. होणाºया परिणामाची जबाबदारी शासनाची असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.