शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

बियाणे प्रक्रिया, साठवण गृह योजना प्रस्तावांची चाैकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:32 IST

धुळे : बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजनेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्य शासनाने घोळ घातला असून या ...

धुळे : बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजनेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावांमध्ये राज्य शासनाने घोळ घातला असून या प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी व शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण व अन्न पुरवठा मंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांनादेखील पद्मविभूषण, पद्मश्री यांसारखे पुरस्कार द्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली. केंद्र शासनाने बियाणे प्रक्रिया व साठवण गृह योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ६० लाखांपर्यंत अनुदान मिळते. या याजनेसाठी २१ प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठविले होते. केंद्राने २१ प्रस्तावांना मंजुरी देत १२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी राज्य शासनाला दिला. मात्र राज्य शासनाने हा निधी वितरीत केलाच नाही. याऊलट २० मार्च २०२० मध्ये १५ प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. त्यानंतर १० मार्चला ७ प्रस्ताव मंजूर केले. त्यापैकी दोन प्रस्ताव केंद्राच्या मंजुरी यादीत नाहीत. केंद्राने दिलेला निधी दोन वर्षे खर्च न करणे, मूळ मंजूर यादीत बदल करून ऐनवेळी नवीन मंजुरी देण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बीजोत्पादन करणारे शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. केंद्र शासन राज्याचा हक्काचा निधी देत नाही तर राज्य शासन विविध योजनांसाठी मिळणारा निधी खर्च करत नाही. केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्राधान्य देण्याचे धोरण जाहीर करते. परंतु कृषी विद्यापीठ या धोरणाच्या विरोधात निर्णय घेते. यामुळे हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

बीजोत्पादन करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून कृषी विद्यापीठातर्फे फी व राॅयल्टी घेण्यात येते. हा चुकीचा प्रकार थांबविण्यात यावा. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत केंद्र शासनाने राज्य शासनाला निधी दिला आहे. या निधीतून राज्य शासन शेतकरी प्रमाणित बियाणे अनुदान देते. हे अनुदान महाबीज, नॅशनल सीड काॅर्पोरेशन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यात येते. पुरस्कारात शेतकरी उत्पादक कंपन्यांना वगळले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही अनुदान द्यावे. पद्मविभूषण, पद्मश्री सारखे पुरस्कार शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याशी चर्चा करून समस्यांचा निपटारा करण्याचे आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिले. शिष्टमंडळात शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष प्रकाश पाटील, अनंता पाटील, भाऊसाहेब कदम, गणेश नवले, राजू गाडे, श्रीकांत आखाडे, भगवानसिंग इंगळे, दत्तात्रय पाटील, चंद्रकांत क्षीरसागर, योगराज पवार आदींचा समावेश होता.