शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार, सव्वादोन लाखात वितरण कंपनीची फसवणूक

By admin | Updated: July 17, 2017 01:11 IST

धुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज मीटर रीडिंगमध्ये फेरफार करून प्रत्यक्षात कमी बिल आकारून वीज वितरण कंपनीची सव्वादोन लाखात फसवणूक केल्याचा प्रकार धुळे तालुक्यातील लोहगड आणि लोणखेडी येथे उघडकीस आलेला आहे़ याप्रकरणी संशयित एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ धुळे ग्रामीणचे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सतीश सोनालाल महाजन (४६) रा़ संत गाडगेबाबा कॉलनी, देवपूर धुळे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे़ सिद्धांत एंटरप्रायझेस, उत्कर्ष बंगला, जयहिंद कॉलनी, देवपूर धुळे यांनी मीटर रीडिंगसाठी नेमलेल्या विठ्ठल लक्ष्मण पाटील (रा़ गरताड ता़ धुळे) याने २५ ते २९ जून २०१७ या कालावधीत धुळे तालुक्यातील लोहगड, लोणखेडी येथील एका वीज ग्राहकाचे मीटर रीडिंग घेतले़ प्रत्यक्षात असलेल्या मीटर रीडिंगपेक्षा कमी युनिटची नोंद करून वीज मंडळाकडे कमी रीडिंग दाखविले़ २१ हजार ४३४ इतके युनिट कमी दाखवून वीज मंडळाचे २ लाख १४ हजार ३७० रुपयांचे वीज मंडळाचे नुकसान करून फसवणूक करण्यात आली़ हा प्रकार उघडकीस आल्याने सतीश महाजन यांनी धुळे तालुका पोलिसात फिर्याद दिली़ यावरून संशयित विठ्ठल पाटील याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़ पुढील तपास सुरूआहे़ दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यामुळे चुकीच्या कामाला आळा बसण्यास मदत मिळणार आहे़