शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय तपासणीनंतरच चंदू येणार गावाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2017 00:37 IST

डॉ़ सुभाष भामरे : चंदू सध्या अमृतसरला; तीन-चार दिवसांची प्रतीक्षा

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबूलाल चव्हाण सध्या अमृतसरला आहे. त्याठिकाणी सैन्याच्या नियमानुसार सर्व आवश्यक  वैद्यकीय तपासणी  आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार दिवसांनी ते गावाकडे येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी रविवारी धुळ्यात दिली़ चंदूच्या कुटुंबीयांनी रविवारी डॉ़ भामरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. चंदू कधी आपल्या गावी बोरविहीरला येणार याची सर्वानाच उत्सुकता आह़े  डॉ़ भामरे यांची भेटचंदू चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी  भामरे यांना साकडे घातले होत़े डॉ़ भामरे यांनी बोरविहीर येथे चंदूच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चंदूला नक्की परत आणू, असे आश्वासन दिले होत़े चंदूच्या सुखरूप परतीने त्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.   चंदू यांचे मोठे बंधू  भूषण आणि आजोबा चिंधा पाटील यांनी रविवारी सकाळी धुळ्यात डॉ. भामरे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला़ यावेळी बोरविहीर येथील युवकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रक्रियेनंतर होणार निर्णयचंदूच्या सुखरूप परतीबद्दल दिलेला शब्द आपण पाळला. यासंदर्भात आपण पाकिस्तानच्या लष्करी अधिका:यांशी  आठवडय़ात दोनदा बोलायचो. तसेच संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांच्यावर दबाव निर्माण केल्यामुळेच हे होऊ शकले, असे भामरे यांनी सांगितले. आपण अमृतसरलासुद्धा जाऊन चंदूची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. कालिका माता मंदिरात दर्शनत्यानंतर चंदूच्या कुटुंबीयांनी  कालिका मातेचे दर्शन घेतल़े अखिल भारतीय यज्ञोपवित बहुउद्देशीय संस्थेतर्फे चंदू बेपत्ता झाल्यानंतर कालिका माता मंदिरात होमहवन करून सर्व मंदिरांमध्ये चंदूच्या कुटुंबीयांच्या हस्ते आरती करण्यात आली होती़ त्यानुसार चंदू सुखरूप मायदेशी परतला़ चंदू गावाकडे आल्यानंतरही त्याच्या हस्ते मंदिरात आरती करणार असल्याचे संस्थेचे पदाधिकारी अनिल दीक्षित यांनी सांगितल़े यावेळी महेश कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, राम जोशी उपस्थित होत़े चंदूच्या कुटुंबीयांनी सर्वाचे आभार मानल़े