वाहतुक कोंडी
धुळे : येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची आणि समर्थकांची सोमवारी गर्दी झाली होती. वाहने रस्त्यावरच लावली होती. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची कोंडी झाली.
गटार तुंबली
धुळे : शहरातील सावरकर पुतळ्याजवळ मोचीवाडालगत गटार तुंबली असून, पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधी पसरल्याने रहिवाशांच्या आरोग्याला धोका आहे.
पावसाळ्याची तयारी
धुळे : पावसाळा सुरू झाला आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी छतांची गळती बंद करण्यासाठी ताडपत्री आणि डिजिटल बॅनर खरेदीकडे महिलांचा कल वाढला आहे. ग्रामीण भागात धाब्यांवर खारी टाकली आहे.
पर्यावरणाला धोका
धुळे : शहरालगत नकाने तलाव, गोदूर विमानतळ परिसरात मद्य पिणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे मद्याच्या बाटल्या प्लॅस्टिकचे ग्लास, पाण्याच्या बाटल्यांचा आदींचा कचरा साचला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.