लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : . मतमोजणी कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई असेल. मतमोजणी करतांना सर्वांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, त्यासाठी सर्व कर्मचाºयांनी सकाळी ६ वाजेपासूनच हजर रहावे असे निर्देश उपविभागीय अधिकारी तथा धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भीमराज दराडे यांनी कर्मचाºयांना दिले. २३ रोजी मतमोजणीअसल्यामुळे ५५० कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी शुक्रवारी १७ रोजी राजर्षी शाहु महाराज नाट्यगृहात मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भागवत डोईफोडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. भीमराव दराडे म्हणाले की, सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यात सर्वात आधी टपाली मतदानाची मोजणी केली जाईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रांची मतमोजणी केली जाईल. शेवटी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी ५ याप्रमाणे ३० व्हीव्हीपॅट यंत्रांच्या चिठ्ठ्यांची पडताळणी केली जाईल. मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय २० या प्रमाणे एकूण १२० टेबल असतील. टपाली व इटीबीपीएस मतमोजणीसाठी अनुक्रमे १० व पाच टेबल असतील. प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी नियुक्त असतील. मतमोजणीच्या एकूण १९ फेºया होतील. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पाच केंद्रांवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची मोजणी होईल. मतमोजणी कक्षात सर्वांना मोबाईल वापरण्यास बंदी असेल, असे दराडे यांनी सांगितले़
मतमोजणीवेळी कर्मचाºयांना मोबाईल वापरण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 22:27 IST