शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

शिरपुरात गुजराथ,हैद्राबादच्या कैरीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 20:51 IST

खरेदीसाठी गर्दी : २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो भावाने होतेय् विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :  शहरातील खंडेराव मंदिर परिसरात भरणाºया कैरीच्या बाजारात   सरासरी २५ रूपयांपासून तर ३५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे लोणच्याची कैरी या बाजारात विकली जात आहे. गुजराथ, हैद्रराबाद, धरमपुरा आदी भागातून कैरी विक्रीला येत आहे.येथील बाजारात बाहेरील व्यापारी कैरी  विक्रीसाठी आणत आहे.  या वर्षी लोणच्यासाठी आलेली कैरी ही निलम, राजापुरी, सरदार आंब्याचीच येत आहे. गावराणी कैरी विक्रीला येत नाही. लोणच्यासाठी आंबट कैरी आवश्यक असते. परंतु ती बाजारात नसल्याने सरदार व राजापुरी कैरीच ग्राहकांना नाईजास्तव घ्यावी    लागली़सरासरी २५ रूपयांपासून तर ३५ रूपये प्रतिकिलो प्रमाणे लोणच्याची कैरी या बाजारात विकली गेली. कैरीचा बाजाराबरोबरच लोणच्यासाठी आवश्यक असलेला गरम मसाला, लसुण, धने, राई तसेच मातीचे खारे व चिनी मातीच्या भरण्या विक्रीसाठी बाजारात होत्या. १०० रूपयापासून ते ५०० रूपयापर्यंत भाव होते. ते खरेदी करण्यासाठी देखील ग्राहकांची गर्दी झाली होती. शिरपूर येथील कैरीच्या बाजारात खरेदी करण्यासाठी तालुक्यातूनच नव्हेतर जळगाव जिल्ह्यातील चोपडा, मध्यप्रदेशातील सेंधवा येथूनही लोक येतात.

*कैरी फोडण्याचे स्टॉल*

विशेष म्हणजे या बाजारात कैºया सुध्दा फोडून देण्यासाठी अनेकांनी स्टॉल लावले आहेत. बाजारात ५ रूपये किलोप्रमाणे  कैरी फोडून देण्यात येते. याठिकाणी कैरी फोडून घेण्यासाठी  गर्दी दिसून आली. बाजारात आलेल्या अनेकांनी घरी जावून कैरी फोडण्यापेक्षा येथून फोडून घेणे अनेकांनी पसंत केले.  कैरी फोडण्याचा सुडा देखील १५०-२०० रूपयापर्यंत बाहेरील लोक विक्री करण्यासाठी आले  होते़.

टॅग्स :Dhuleधुळे