शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चातर्फे आनंदोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:40 IST

मराठा आरक्षण : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा बाबत अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय देऊन मराठा आरक्षण मंजूर केले़ विरोधातील सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत़ मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळणार असल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे़ *अभ्यासपूर्ण दृष्टीकोन*मराठा समाजाचा आरक्षण मागणीचा शांतपूर्ण संघर्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मराठा आरक्षण संबंधी कालबध्द कार्यक्रम आणि अभ्यासपूर्ण दृष्टीकोणाचा हा विजय आहे़ याचा फायदा सर्वसामान्य नागरीकांना होणार आहे़ - जयकुमार रावलमंत्री पर्यटन व रोहयो *आरक्षणासाठी संघर्ष*महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला़ महाराष्ट्रभर आंदोलन झालीत़ त्यात मराठा समाजाच्या ४० तरुणांनी बलिदान दिले़ यातूनच मराठा समाजाला आरक्षणाची किती आवश्यकता आहे हे दिसून येते. या आंदोलनात धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिनाभर आंदोलन केले़ त्यातच प्रतिकात्मक आंदोलन करून  मराठा समाजच्या १४२ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली़ आरक्षण मिळाल्याने आनंद आहे़ - मनोज मोरे, जिल्हाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा*एकजुटीचा हा विजय *मराठा समाजाला सरकारी नोकºयांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देणाºया कायद्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे़ हा राज्यातील तमाम मराठा समाजाच्या जनआंदोलनाचा मोठा ऐतिहासिक विजय आहे. या आरक्षणामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार, विरोधी पक्ष, राज्य मागास आयोग तसेच न्यायालयाचे मनापासून आभार मानतो़ तसेच मराठा समाजाच्या एकजूटीचा हा विजय आहे़- निंबा मराठेजिल्हा सचिव, मराठा क्रांती मोर्चा, धुळे जिल्हा *ही तर आनंदाची बाब*मराठा समाजाला आरक्षण मिळाले, ही आनंदाची बाब आहे़ आज मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे़ या समाजाला आरक्षणामुळे विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी मदत मिळणार असून शिक्षण आणि नोकरी यात फायदा होणार आहे़ आरक्षणाचे स्वागत करायला हवे़ - मिना भोसलेसदस्य, मराठा क्रांती मोर्चा

टॅग्स :Dhuleधुळे