शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात पहिल्या दिवशी पाचशे क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 21:54 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती : जवाहर सुतगिरणी कापूस खरेदी सुरू, कापसाला मिळाला पाच हजार ३५५ रुपये भाव

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे मोराणे येथील जवाहर सुतगिरणीत कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्याने ऐन खरीप हंगामाच्या तयारीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़पहिल्याच दिवशी पाचशे क्विंटल कापूस खरेदी झाली़ कापसाला पाच हजार ३५५ रुपये भाव मिळाल्याने लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांची आर्थिक अडचण दूर झाली असून आता खरीप हंमागाच्या तयारीला वेग येणार आहे़ओला दुष्काळ आणि कोरोनाच्या आजारामुळे जाहिर केलेल्या टाळेबंदीमुळे शेतकरी संकटात सापडले होते़ प्रत्येक शेतकºयांच्या घरात शेकडो क्विंटल कापूस पडून होता़ त्यामुळे शासनाकडे प्रयत्न करुन जवाहर सुतगिरणीमध्ये कापूस केंद्र सुरु करुन घेतले, अशी माहिती धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली़माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जवाहर सुतगिरणीमध्ये मंगळवारपासुन कापूस खरेदीला प्रारंभ झाला़ आमदार पाटील यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करुन खरेदी सुरु केली़यावेळी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, सुतगिरणीचे व्हा़ चेअरमन प्रमोद जैन, बाजार समितीचे उपसभापती रितेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ़ दरबारसिंग गिरासे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, पंचायत समिती सदस्य पंढरीनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य विशाल पाटील, कार्यकारी संचालक अशोक नन्ना, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, आप्पा खताळ, अशोक सुडके, किर्तीमंत कौठळकर, बापू नेरकर, बापू खैरनार, शांताराम लाठर, एस़ एम़ पाटील, सहकार अधिकारी राजेंद्र विरकर, विजय भडागे, कामगार अधिकारी नवल पदमर, रामेश्वर महाजन, अमोल एंडाईत आदी उपस्थित होते़दरम्यान, सदर केंद्रावर कापूस विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीची सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीने उपलब्ध करुन दिली होती़ कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कापूस खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्याचे नियोजन आहे़ त्यासाठी नोंदणी केलेल्या पहिल्या वीस शेतकºयांना धुळे बाजार समितीचे सभापती सुभाष देवरे यांच्या हस्ते कापूस खरेदीचे टोकण वाटप करण्यात आले़यावेळी उप सभापती रितेश पाटील, संचालक किर्तीमंत कौठळकर, विजय चिंचोले, गंगाराम कोळेकर, कापूस उत्पादक पणन महासंघाचे एस़ एम़ पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव दिनकर बारकू पाटील यांच्यासह कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते़ सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले़कापूस विक्रीसाठी वीस शेतकºयांनी आॅनलाईन संकेतस्थळावर नोंदणी केली होती़ त्यानुसार या शेतकºयांना कापूस विक्रीसाठी बोलावण्यात आले होते़ त्यापैकी पंधरा शेतकºयांनी पाचशे क्विंटल कापूस मंगळवारी विक्री केला़ वाहने उपलब्ध न झाल्याने पाच शेतकरी येवू शकले नाहीत़ या शेतकºयांचे सोयीनुसार नियोजन करण्यात येणार आहे़ बुधवारसाठी वीस शेतकºयांना टोकन दिले जाणार आहे़ या शेतकºयांना बोलावण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे