शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हयात बीटी बियाणे २० मे नंतर मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:50 IST

जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर कापूस लागवड प्रस्तावित

ठळक मुद्देजिल्ह्यात खरीपाची तयारी सुरूकापूस लागवडीकडे शेतकºयांचा कलबीटी बियाण्यांची प्रतीक्षा

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात कापूस लागवडीकडे असलेला शेतकऱ्यांचा कल लक्षात घेता यावर्षी जवळपास सव्वा लाख बीटी कापूस बियाण्यांची पाकीटे उपलब्ध होणार आहे. १६ मे रोजी पुण्यात आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक होणार असून, त्यानंतरच बीटीची बियाणे मिळणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.जिल्ह्याचे खरीपाचे क्षेत्र ४ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यापैकी २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, असे कृषी विभागाचे नियोजन आहे.कापूस हे नगदी पीक असल्याने, शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे सर्वात जास्त कल आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने, कमी पावसातही कपाशीचे बºयापैकी उत्पन्न येत असल्याने, शेतकरी कापूस लागवडीलाच प्राधान्य देत असतात.२०१९-२० या वर्षातील खरीप हंगामाचे नियोजन कृषी विभागाने केलेले आहे. त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे बीटी, तसेच संकरित कापूस वाणांच्या बियाण्यांची मागणी करण्यात आलेले आहे. यात कपाशीची महाबीजकडून ११०० पाकीटे सुधारित वाणाचे व ११ हजार ५०० पाकीटे बीटीयुक्त कापूस बियाण्यांचे उपलब्ध होणार आहेत. खाजगी बियाणे उत्पादकांकडून १० लाख ४४ हजार पाकीटे उपलब्ध होणार असून, त्यात ९ हजार पाकिटे सुधारित वाणांची तर १० लाख ३५ हजार पाकीटे बीटीयुक्त कापसाचे पाकीटे उपलब्ध होणार आहेत.येत्या १६ मे रोजी कृषी आयुक्तांच्या उपस्थितीत राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक होणार आहे. त्यानंतरच बीटी कापूस बियाणे विक्रीचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येत्या २० मे नंतरच शेतकºयांना बीटी कापूस बियाणे मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.दरम्यान काही ठिकाणी बीटी कापूस बियाण्यांची जादा दराने विक्री होत असते. यावर आळा बसावा म्हणून केंद्रातील कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने ८ मार्च १९ रोजी बीटी कापूस बियाण्याचे दर निश्चित केले आहे. त्यानुसार बीजी-१ ६३५ व बीटी-२ ७३० रूपयांनी विक्री होईल असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे