शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

साक्री येथे रक्तदान शिबिर उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:59 IST

कृषी मंत्र्यांची उपस्थिती : बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री तालुका शिवसेना व आमदार मंजुळा गावित यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी आमदार मंजुळा गावित, डॉ.तुळशीराम गावित, शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, तालुका प्रमुख विशाल देसले, साक्री तालुका विधानसभा संघटक पंकज मराठे व शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.साक्री येथील विश्रामगृहात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनाअगोदर कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची भेट घेऊन अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळेस काटवान भागातील शेतकºयांनी शिवसेना तालुका प्रमुख विशाल देसले यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. फळपीक विमा योजनेसंदर्भात साक्री तालुक्यातील शेतकºयांवर मोठा अन्याय होत असून तालुक्यातील इतर मंडळांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतू कासारे, साक्री परिसरातील फळबाग लागवड करणाºया शेतकºयांना फळपीक विमा लाभ मिळालेला नाही. तरी शेतकºयांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकºयांनी केली. तसेच तालुक्यातील अनेक शेतकºयांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका संघटक पंकज मराठे, बाळा शिंदे, बंडू गीते आणि शिवसैनिकांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.