धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत केवळ २१९ बॅग शिल्लक आहेत. त्यात ओ-पॉझिटिव्ह रक्तगटाच्या सर्वाधिक ७० बॅग उपलब्ध आहेत, तर एबी निगेटिव्ह रक्तगटाच्या केवळ पाच बॅग उपलब्ध आहेत. ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या ४०, ए निगेटिव्ह ८, बी पॉझिटिव्ह ६०, तर बी निगेटिव्ह रक्तगटाच्या १२ बॅग शिल्लक आहेत. दरम्यान, उपलब्ध रक्तसाठा महिनाभर पुरू शकतो. जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. लस घेतल्यानंतर किमान दोन महिने रक्तदान करता येत नाही. यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या झपाट्याने घटली आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. दरम्यान, रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
रक्तपेढ्या ऑक्सिजनवर; ३० दिवस पुरेल एवढाच साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:37 IST