शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी कांद्याला खंडित वीजपुरवठा

By admin | Updated: January 7, 2017 00:33 IST

वेळापत्रक कोलमडले : शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांची धडपड

पिंपळनेर : सद्य:स्थितीत रब्बी हंगामास वेगात सुरुवात झाली असून कांदा लागवड अंतिम टप्प्यात असल्याने पीक  जगवण्यासाठी रात्रंदिवस शेतात पाणी भरण्यासाठी शेतक:यांना थंडीत जावे लागते. त्यातच पाण्याचे वेळापत्रक देऊनसुद्धा त्यात मोठय़ा प्रमाणात विजेचा लपंडाव सुरू असून अखंडित वीज मिळावी, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे. रब्बी हंगाम सुरू झाला असून शेतक:यांनी गहू, कांदा, मका, ऊस यांची लागवड केली आहे. पिकांना योग्यवेळी पाणी मिळावे यासाठी शेतक:यांची पाणी भरण्यासाठी धडपड सुरू आहे. यात वीज वितरण विभागाने कृषीसाठी स्वतंत्र लाईनचे आठवडय़ाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र शेतक:यांना त्या वेळापत्रकानुसार वीजपुरवठा केला जात असला तरी त्या वेळेतच असंख्य वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्याने तसेच रात्री-पहाटे फ्यूज उडून जात असल्याने फ्यूज नव्याने टाकावा लागतो. पाण्याचा भरणा योग्यवेळी पूर्ण होत नाही. शेतक:यांना थंडीत पाणी भरण्यासाठी जावे लागत आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्या शेतक:यांना येत आहेत.सध्या शेतक:यांना रब्बी हंगामासाठी सोमवार ते गुरुवार रोज रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत वीजपुरवठा सुरू असतो. तर शुक्रवार ते रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत पुरवठा देण्यात आला आहे. यात सोमवार ते गुरुवार ही जी रात्रीची वेळ वीज मंडळातर्फे देण्यात आली आहे त्यातही रात्री ब:याच वेळा पुरवठा खंडित होतो. तसेच फ्यूज उडतो. म्हणजे जे शेतकरी रात्री-पहाटे शेतात पाणी भरतात त्यांना या अडचणी येतात. तसेच रात्री-पहाटे शेतात लाईट गेल्यानंतर शेतात थांबून राहावे लागते. विजेची वाट पाहावी लागते. रात्रीच्या वेळी थंडी, तसेच विंचूकाटय़ाची, साप, जनावरे यांची भीती असते. रात्री फ्यूज उडाला तर वायरमन रात्री येत नाहीत. पाणी भरणे थांबते. यामुळे पिकं खराब होतात. सोमवार ते गुरुवार रात्री 12 ते सकाळी 10 वाजेर्पयत जी वीज मिळते ती 10 तास मिळते. तर शुक्रवार ते रविवार या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी सहा वाजेर्पयत म्हणजे आठ तास वीज मिळते. शेतक:यांची मागणी आहे की, जी रात्रीची वीज मिळते ती दिवसा करावी, त्यामुळे          शेतक:यांना पाणी भरणे सोपे होणार आहे. सरकारने दिवसा 12 तास लाईट द्यावी. रात्रीच्या वेळी जीवाला धोका असतो. नुकत्याच पाच दिवसांपूर्वी इनाम शिवारात तरस मयत आढळून आला. यामुळे शेतक:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.