शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती प्रकल्पात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:26 IST

मालपूर : भीषण पाणीटंचाईचे सावट, प्रकल्पाच्या पात्रात चार विहीरीचे खोदकाम फेल

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे आतापासूनच दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अमरावती मध्यम प्रकल्प हा एकमेव गावाची तहान भागविण्याचा पर्याय असून तेथेही संपूर्णपणे पाण्याचा साठा संपला आहे. यामुळे पाणीटंचाई भीषण स्वरुप धारण करणार आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात जमिनीत झिरपलेले पाणी पोकलँड मशिनच्या सहाय्याने मोठा खड्डा करुन जलस्त्रोत वाढविण्याचा सध्या प्रयत्न दिसून येत आहे.कधी नव्हे एवढे भीषण पाण्याचे संकट मालपूर गावावर घिरट्या घालत आहे. सुमारे २० हजार लोकवस्तीच्या गावाची तहान कशी भागवावी या विवंचनेत ग्रामपंचायत प्रशासन दिसून येत आहे. यासाठी वेळ न घालवता नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पदभार स्विकारण्याच्या आधीच येथील अमरावती मध्यम प्रकल्पात नवीन विहीरीचे खोदकाम युद्धपातळीवर सुरु केले. चार ठिकाणी आधुनिक पोकलँडच्या यंत्राच्या सहाय्याने भला मोठा खड्डा केला. मात्र, १५ ते २० फुटावर खडक लागल्याने अपयश आले. पाचव्या ठिकाणी प्रयत्नांना थोडेफार यश आले. मात्र, यावर आगामी पावसाळ्यापर्यंत गावाची तहान भागेल, याची शाश्वती नाही. याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्यामुळे मालपूर गावावर पाण्याचे संकट गडद होतांना दिसत आहे. एवढ्या मोठ्या गावाला टँकरने पाणीपुरवठा करणेही अशक्य असून या संकटाचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी काय उपाययोजना करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Dhuleधुळे