शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची जादू पुन्हा चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:08 IST

सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघानी दिली डॉ.भामरेंना साथ

धुळे : लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांनी ६ लाख १३ हजार ५३३ मते मिळवून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. तर काँग्रेसचे कुणाल पाटील यांना ३ लाख ८४ हजार २९० मते मिळाली. निवडणुकीत डॉ.सुभाष भामरे यांना २ लाख २९ हजार २४३ एवढे मताधिक्य मिळाले. डॉ.भामरे यांना २०१४ च्या निवडणुकीत ५ लाख २९ हजार ४५० मते मिळाली होती. म्हणजेच डॉ.भामरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ८४ हजार ८३ मते अधिक मिळविली. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघातून डॉ.भामरे यांना मताधिक्य मिळवित सन २०१४ च्या निवडणुकीची पुनरावृत्ती घडवली.धुळे : सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ.सुभाष रामराव भामरे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा २ लाखांचे मोठे मताधिक्य पराभव केला. सुरुवातीला धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार अशी अपेक्षा निकालानंतर पोल ठरली. डॉ.भामरे यांनी पहिल्या फेरीपासूनच लीड घेतला होता तो अंतिम फेरीपर्यंत वाढतच गेला.गुरूवारी सकाळी ७.३० वाजता उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व मतमोजणी निरीक्षकांच्या उपस्थितीत स्ट्रॉँगरूम उघडून मतमोजणीस प्रारंभ झाला. सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू झाली. एकूण १९ फेºया झाल्या. भाजपाचे उमेदवार डॉ.भामरे यांनी केवळ एक फेरी वगळता डॉ.भामरे यांनी प्रत्येक फेरीत आपली आघाडी वाढवत नेली. यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत गेला. १९ व्या फेरीअखेर डॉ.भामरे यांचा विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष सुरू केला. शहर व जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साह पहावयास मिळाला.शहरातील नगावबारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाशेजारी असलेल्या शासकीय धान्य गोदामात विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी २० या प्रमाणे १२० टेबलांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण झाली. यानंतर रॅन्डम पद्धतीने केंद्रांची निवड करून तेथील व्हीव्हीपॅट मतांची पडताळणी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने केलेल्या जय्यत तयारीमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.वाढलेले तापमान लक्षात घेऊन बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मंडपांची व्यवस्था केली होती. गोदाम परिसरात पोलिसांच्या वाहनांसह अग्निशमन बंब, १०८ क्रमांकाच्या दोन रूग्णवाहिका, तत्काळ उपचारासाठी आरोग्य विभागाचे पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. व्हीव्हीपॅट मत पडताळणीला चार तासांचा कालावधी लागला.

टॅग्स :Dhuleधुळे