शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नळाच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:58 IST

तक्रार : ग्रामपालिकेपुढे जीर्ण जलकुंभावर झाकण बसविण्याचे आव्हान

निजामपूर : येथील बस स्टँडच्या मागे असलेला जलकुंभ जीर्ण झाला आहे. त्याच्या छतावरील झाकण तुटून जलकुंभात पडले आहे. या जलकुंभावर कबूतर, कावळे आदी पक्ष्यांचा थवा बसलेला असतो. त्यामुळे या पाण्यात पक्ष्यांची पिसे, विष्टा पडत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. दरम्यान, काही नागरिकांनी सरपंचांकडे नळाच्या पाण्यात पक्ष्यांची पिसे आढल्याची तक्रार केली आहे.या जलकुंभाचे बांधकाम १९८४ मध्ये झाले आहे. आता हा जलकुंभ जीर्ण झाला असून जागोजागी प्लास्टर निखळून पडले आहे. जलकुंभावर पिंपळ वृक्ष देखील वाढत आहे. जलकुंभाच्या छतावरील झाकण तुटून टाकीत पडले आहे. त्यामुळे जलकुंभात पक्ष्यांची पिसे, विष्टा पडू नये, यासाठी उपाय योजना तरी कशी करावी, अशी समस्या ग्रामपालिकेस भेडसावत आहे.पक्षी जलकुंभात शिरु नये. यासाठी जलकुंभावर नवीन झाकण किंवा जाळी बसवावी लागणार आहे. मात्र, जलकुंभ बराच उंच आहे. आणि वर चढण्यासाठी असलेली लोखंडी शिडीही पार गंजून गेली आहे. एका ठिकाणी तर शिडीला आधारही नाही. टाकीवर खिळे ठोकायचे तर बांधकाम तुटते. जलकुंभावर चढण्यास कुणी धजावत नाही. त्यामुळे ही समस्या कशी दूर करावी, या विवंचनेत ग्रामपालिका असल्याचे सरपंच सलीम पठाण यांनी सांगितले.आता एस.के. नगरात नवीन जलकुंभाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, तोपर्यंत या जलकुंभातूनच गावास पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर हा जलकुंभ पाडला जाणार आहे. त्यामुळे जोपर्यंत या जलकुंभावरुन पाणीपुरवठा सुरु आहे. तोपर्यंत या जलकुंभाची देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र, जलकुंभ जीर्ण झाल्याने अडचणी येत आहेत. त्यावर जिकीरीने तोडगा काढून जलकुंभावर हिरव्या कापडी जाळीचे आच्छादन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Dhuleधुळे