शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मनोरूग्णाला बस वाहकाकडून अपमानास्पद वागणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:52 IST

नंदुरबार-दोंडाईचा दरम्यानचा प्रकार : मनोरूग्णाने वकीलामार्फत धुळे विभाग नियंत्रकांकडे केली तक्रार

ठळक मुद्देमनोरूग्ण नंदुरबार ते दोंडाईचा प्रवास करीत होतावाहकाने रूग्णांच्या मदतनीसाला सवलत नाकारलीरूग्णाने वकीलामार्फत विभाग नियंत्रकांकडे केली तक्रार

आॅनलाइन लोकमतधुळे : दिव्यांग व्यक्तीला व त्याच्यासोबत असलेल्या मदतनीसाला बस प्रवास सवलत असतांनाही वाहकाने मनोरूग्ण व त्याचा साथीदार यास प्रवास सवलत नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार घडला आहे.दोंडाईचा येथील एक तरूण स्कीझोफेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्याच्याकडे शासकीय रूग्णालयातील ५५ टक्के वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. त्याला औषोधोपचारासाठी धुळे तसेच आयुर्वेदीक गोळ्या घेण्यासाठी नंदुरबारला जावे लागते. अंध अपंग व्यक्तीस ७५ टक्के व मदतनीसाला ५० टक्के सवलत महामंडळातर्फे देण्यात येते. हे दोन्ही सवलतीचे कार्ड त्यांच्याजवळ होते.६ मे रोजी तो मनोरूग्ण तरूण व त्याचा मदतनीस हे सायंकाळी नंदुरबार-धुळे बसमध्ये (क्र. एमएच ४०- एन ९०७९) बसले. बस शहरापासून पाच-सहा किलोमीटरवर आली असतांना वाहक रत्नाकर बागूल यांनी मनोरूग्ण प्रवाशाकडे तिकिटाचे पैसे मागितले. त्यांनी अंध अपंग व्यक्तीचे ओळखपत्र दाखविले.मात्र केवळ ५५ टक्के असा उल्लेख असल्याने बस वाहकाने त्या रूग्णाच्या साथीदारास ५० टक्के सवलत देण्यास नकार दिला. रूग्णाने त्याच्याजवळील ओळखपत्र, वैद्यकीय कागदपत्र दाखवूनही वाहकाने अरेरावी करून बसखाली उतरून जा असे सांगितले. त्यावेळी इतर प्रवाशांचा खोळंबा नको म्हणून मनोरूग्णाने ७५ टक्के प्रमाणे तिकीटाचे १० रूपये व मदतनीसाचे ४५ रूपये असे ५५ रूपये देवून तिकीट घेतले.दरम्यान वाहकाने मनोरूग्णास नियमानुसार मिळणारी बस प्रवास सवलत नाकारून इतर प्रवाशांसमोर अपमानास्पद वागणूक दिली. त्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. या संदर्भात त्याने अ‍ॅड. विनोद बोरसे यांच्या मार्फत धुळे विभागाच्या विभागनियंत्रकांकडे तक्रार केली आहे. त्यात बस वाहकाची योग्य चौकशी करून तक्रारदार मनोरूग्णास न्याय देण्याची मागणी आहे. अर्जावर तक्रारदार व अ‍ॅड. बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.चौकशीचे आदेशवाहकाने मनोरूग्णास अपमानास्पद वागणूक दिल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. या प्रकरणाची विभागीय वाहतूक अधिकारी चौकशी करणार आहेत. संबंधितांचे जाबजबाब घेऊन, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे