शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता व्हा आत्मनिर्भर; १९२ जणांना मिळणार १० लाखांपर्यंत अनुदान, जिल्ह्यातून आतापर्यंत २९ अर्ज; धुळे, साक्रीतून दोन प्रस्ताव बँकांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:42 IST

धुळे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या ...

धुळे : केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग ही योजना २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीत राबविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के आणि कमाल १० लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

या योजनेसाठी जिल्ह्याला १९२ प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. आतापर्यंत २९ अर्ज आले असून, त्यापैकी धुळे आणि साक्री तालुक्यात प्रत्येकी एका प्रस्तावाला जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. दोन्ही प्रस्ताव कृषी विभागाने संबंधित बँकांकडे अर्थसाहाय्यासाठी पाठविले आहेत.

‘एक जिल्हा एक उत्पादन’ या धर्तीवर ही योजना राबविली जाणार आहे. धुळे जिल्ह्यात केळी पिकासाठी ही योजना मंजूर आहे. या योजनेंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी तसेच सामाईक पायाभूत सुविधा केंद्रासाठी ३५ टक्के अनुदान, ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान, स्वयंसाहाय्यता गटांना बीज भांडवल तसेच लहान उपकरणे खरेदीसाठी ४० हजार प्रतिसभासद याप्रमाणे ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान देय राहील. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या घटकांतर्गत नवीन प्रकल्पांचे प्रस्ताव सादर करता येतील. सद्य:स्थितीत अस्तित्वात असलेल्या अन्न प्रक्रिया प्रकल्पांच्या विस्तारीकरणासाठी स्थरवृद्धी, आधुनिकीकरण या प्रकल्पांचे प्रस्तावदेखील या योजनांमध्ये सादर करता येतील. म्हणजे केळी पिकावर आधारित नवीन अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करता येईल, तर या पिकांव्यतिरिक्त अन्य अन्न घटकांसाठी आधीचा प्रकल्प वाढविण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

कोणाला घेता येणार लाभ?

पीएमएफएमई ही योजना असंघटित, नोंदणीकृत अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी आहे. धुळे जिल्ह्यात केळी पिकाला प्राधान्य दिले आहे. केळी उत्पादकांना नवीन उद्योग सुरू करता येईल. अन्य उद्योगांसाठी आधीचा उद्योग वाढविण्यासाठी अनुदान मिळणार आहे. व्यक्तिगत शेतकरी, शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, संस्था, बचत गट, सहकारी उत्पादक तसेच शासन यंत्रणा किंवा खासगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ घेता येईल.

तालुकानिहाय उद्दिष्ट असे...

असा करा अर्ज

एमआयएस पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाते.

यासाठी प्रत्येक तालुक्यात संसाधन व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासह सर्व तालुका कृषी अधिकारी आणि गाव पातळीवर कृषी सहायकांशी संपर्क साधल्यावर सहकार्य केले जाते.