शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार थांबविण्यासाठी हवे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 22:03 IST

रसिका निकुंभ : महिला सुरक्षा विषयावर केले प्रबोधन

धुळे : ााध्यमांमध्ये समाज बदलाची ताकद आहे. महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी माध्यमांनी पुढाकार घेत सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी प्रबोधन करावे, असे प्रतिपादन अ‍ॅड़ रसिका निकुंभ यांनी गुरुवारी कार्यशाळेत व्यक्त केले़जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय धुळे, जिल्हा महिला व बालकल्याण विकास विभाग धुळे, जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला सुरक्षा आणि सायबर कायदे, पोलिस यंत्रणा आणि वृत्तांकन’ याविषयावर विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मुख्य सभागृहात पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परीविक्षा अधिकारी एम. एम. बागूल, विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अक्षय छाजेड, सदस्य पितांबर महाले, प्रा. अनिल दामोदर, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा रावळ आदी उपस्थित होते.अ‍ॅड़ निकुंभ म्हणाल्या, महिलांची सुरक्षा हा विषय अत्यंत संवेदनशील असून यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे. महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, मानसिकता माध्यमांनी जनजागृती करीत बदलावी. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न झाले पाहिजेत. जेणेकरुन सामाजिक चित्र बदलण्यास मदत होईल. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथके, मोबाईल अ‍ॅप, हेल्पलाइन क्रमांक असून स्व-संरक्षणासाठी महिलांनी सक्षम झाले पाहिजे. तसेच समाजमाध्यमांचा वापर काळजीपूर्वक करावा, असेही त्यांनी सांगितले.बोडके म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध कायदे आहेत. हेल्पलाइनच्या माध्यमातून महिलांना तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकते. माध्यमांनी महिला विषयक कायद्यांची माहिती उपलब्ध करुन दिल्यास महिलांमध्ये जनजागृती होण्यास मदत होईल़ छाजेड म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना होत आहेत. अलिकडे महिला स्व- संरक्षणाबाबत जागरूक झाल्या आहेत. पत्रकार सुनील पाटील म्हणाले, धुळे जिल्ह्यातील पत्रकारिता प्रगल्भ आहे. समाजात चुकीचा संदेश जाणार नाही याची नेहमीच दक्षता घेतली जाते. तसेच जिल्ह्यातील माध्यमांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असेही सांगितले.मान्यवरांच्या हस्ते विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख प्रा. प्रवीण सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परीविक्षा अधिकारी श्री. बागूल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, महिला व बालकल्याण विभागाच्या अर्चना पाटील, मनोहर पाटील, चैतन्य मोरे, भूषण सोनवणे, अरुण वंजारी आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Dhuleधुळे