शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जलद बसेस स्थानकात नेण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 19:06 IST

देवपूर बसस्थानक :  बसची प्रतीक्षा करून  कंटाळलेल्या  प्रवाशांना मध्यवर्ती स्थानकात जावे लागते

ठळक मुद्देdhule

धुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी देवपूर बसस्थानक सुरू करण्यात आलेले आहे. मात्र लांब पल्याच्या बसगाड्यांचे  चालक या स्थानकात  बस न नेता परस्पर नेतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.  तसेच  मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस या ठिकाणी येत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. या स्थानकात शिरपूर, नंदुरबारकडे जाणाºया सर्व जलद बसेस आल्या पाहिजेत अशी प्रवाशांची मागणी आहे. धुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. देवपूरसह नगावबारी, वलवाडी, वाडीभोकर, नेहरूनगर, विद्यानगरी व लगतच्या परिसरातील प्रवाशांना महामंडळाच्या बसने प्रवास करायचा असल्यास, जवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मध्यवर्ती बसस्थानकातच यावे लागत होते. त्यामुळे देवपुरला बसस्थानक व्हावे अशी मागणी सुरू झाली. देवपूर बसस्थानक कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. सहा वर्षांपूर्वी बीओटी तत्वावर येथे  प्रशस्त बसस्थानक बांधण्यात आले. बसस्थानक झाल्याने, या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.बसस्थानकाचा डोलारा मोठा असला तरी तो प्रवाशांसाठी फायदेशीर नाही. या बसस्थानकातून सकाळी ६ वाजता पहिली बस सुटते. तर शेवटची बस  रात्री ९ वाजता सुटत असते. दिवसभरात या स्थानकात शेकडो बसेस येतात व जातात असे महामंडळाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या बसस्थानकासमोरील मार्गावरून शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नंदुरबार, शहादा, औरंगाबाद  भोपाळ, उज्जैन या शहरांकडे  बसेस जात असतात. साध्या तसेच ग्रामीण भागात जाणाºया बसगाड्या येथे येत असल्या तरी, जलद गाड्या या ठिकाणी न थांबता परस्पर जात असतात,अशी प्रवाशांची तक्रार आहे. प्रवाशी स्थानकातच बसची वाट पहात असतात. मात्र ती बस केव्हाच निघून गेलेली असते. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना तेथून  रिक्षा भाडे खर्च करून मध्यवर्ती बसस्थानकात यावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होतो तो निराळाच. बसस्थानकाची उभारणी प्रवाशांच्या सोयीसाठी झालेली असल्याने, त्याठिकाणी सर्व बस जातील-येतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. मध्यप्रदेशच्या बसेसही येत नाहीमध्यवर्ती बसस्थानकात होणारी गर्दी लक्षात घेता, इंदूरकडे जाणाºया राज्य व मध्यप्रदेशच्या बसगाड्या या देवपूर स्थानकातच थांबतील. तेथून सुटतील असे विभाग नियंत्रकांनी आदेश काढले आहेत. परंतु या स्थानकात इंदूर, उज्जैन, भोपाळकडे जाणाºया मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस येतच नाही, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणाहूनही मध्यप्रदेशात जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे मध्यप्रदेशच्या बसेस येणे गरजेचे आहे. या बसस्थानकात कोणत्या बसेस येतात, कोणत्या परस्पर जातात यावर लक्ष ठेवून स्थानकात जलद बस न आणणाºया चालकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे