हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात अवकाळी व गारांचा पाऊस हाेण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील तापमान ३२ अंश होते, तर शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३० अंशांपर्यंत येऊन पाेहोचला होता. त्यानंतर, ३१ मार्च रोजी बुधवारी कमाल तापमान ३९.० तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते.
यंदा तापमान अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढेच राहणार आहे. तापमान वाढल्याने शहरातील प्रमुख रस्ते दुपारी निर्मनुष्य होत आहेत, तर शीतपेयांना मागणी वाढली आहे़ टोप्या, उपरणे, रुमाल, गॉगल्सचा वापर करण्यास नागरिकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. अनेक व्यावसायिक दुपारच्या वेळी दुकाने बंद ठेवत आहेत.
नागरिकांनी कोरोनासोबतच वाढत्या उन्हाचीही काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.